कंपनीत अडीच लाखाची चोरी
नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत चोरट्यांनी ऍल्युमिनियमचे २ लाख ५१ हजार ४७६ रूपयांचे सहित्य चोरून नेल्याची घटना २५ ते ३० मे दरम्यान घडली. याप्रकरणी प्रतिप कुमार रे (७४, रा. महात्मानगर, नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांची अंबड औद्योगिक वसाहतीत ते ५१ या प्लॉटमध्ये रेनार इंडस्ट्रिज नावाची कंपनी आहे. लॉकडाऊनच्या काळात कंपनी बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी खिडीकीतून आत प्रवेश करून कंपनीतील ऍल्युमिनियम ऍलॉयचे २ लाख ५१ हजार ४७६ रूपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरिक्षक शेवाळे करत आहेत.
—
वासन नगरला मंदिरात चोरी
नाशिक – पाथर्डीफाटा परिसरातील वासननगर येथील देवी मंदिरात चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीचे श्रीयंत्र चोरून नेल्याची घटना २५ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी योगेश पोपट इंगळे (रा हरिओमनगर, पेठरोड पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वासन नगर येथील दिवी मंदिराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीचे पिवळ्या रंगाचे श्रीयंत्र चारून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राणे करत आहेत.
—