नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग क्रमांक २४ मध्ये कमी दाबाचा व अवेळी, तसेच काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत आहे. स्वच्छ व सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधील कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क या भागात सतत कमी दाबाचा व अवेळी पाणी पुरवठा होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही यात सुधारणा होत नाही. काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत आहे, यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी शिवसेनेकडे केली.
प्रभागात स्वच्छ व सुरळीत पाणी पुरवठा करा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, बापूराव पाटील, मनोज पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मगन तलवार, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, सतीश मणिआर, सचिन राणे, हरिष काळे, प्रथमेश पाटील, पुरुषोत्तम शिरोडे आदींनी दिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, तसेच पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी याबाबत निवेदन देण्यात आले.