नाशिक – लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट, लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स तसेच नवचेतना फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थंडीपासून बचाव होण्यासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. नाशिक शहरातील जवळपास 200 गरजू कुटुंबाना त्याचा लाभ झाला. ह्या सेवाकार्यासाठी कॉर्पोरेट क्लबचे अध्यक्ष विनय बिरारी, रॉयल्स क्लबचे अध्यक्ष सतीश अलई, अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, नवचेतना फॉउंडेशनचे प्रशांत पाटील, विजय बाविस्कर व देसले उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट चे अध्यक्ष विनाय बिरारी व लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्सचे अध्यक्ष सतीश अलई यांनी मागील वर्षी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून आजपर्यंत अनेक सेवकार्य करून गरजू कुटुंबाना आधार देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. तसेच पुढेही असेच सेवकार्य लायन्स क्लब तर्फे यापुढेही चालूच राहील, असेही त्यांनी सांगितले आहे.