नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर परिसरातील अशोकनगर येथे आज सकाळी बिबट्याचा धुमाकूळ पहायला मिळाला. पंढरीनाथ काळे यांच्या शिवतीर्थ बंगल्याच्या बाल्कनीत अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात नागरिकांची प्रचंड पळापळ सुरु झाली. स्थानिकांनी तातडीने पोलिस आणि वनविभागाशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे दाखल झाला. पाठोपाठ वनविभागाची रेस्क्यू टीमही सज्ज झाली. या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यातच रिमझिम पाऊसही सुरू होता. नागरिकांची गर्दी आणि त्यात बिबट्याला पकडण्याचे आव्हान होते.
अखेर वनविभागाने या बिबट्याला बेशुध्द करुन जेरबंद केले आहे. बंगल्याच्या सात फुट संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन बिबट्या बंगल्याच्या आवारात शिरला. त्यानंतर त्याने बाल्कनीत ठाण मांडले. गेल्या काही दिवसांपासून शहरात बिबट्याचे विविध भागात दर्शन होत आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचे जंगलातून शहरीभागाकडे येण्याचे प्रमाण वाढत आहे.
Nashik leopard sighting in ashok nagar area of satpur Video