नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गांधीनगर येथील आर्टिलरी सेंटरच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या जेरबंद झाली आहे. या मादीला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गांधीनगरजवळील आर्टिलरी सेंटर परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल परिसर असल्याने तेथे बिबट्याचा वावर वाढला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी येथे बिबट्याने भरदिवसा दर्शन दिले होते.
आर्टिलरी सेंटर प्रशासनाने परिसरात पिंजरा लावण्याविषयी पत्रव्यवहार केला होता. वन विभागाने येथे शुक्रवारी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात सकाळी बिबट्या मादी अडकली असून वनविभागाने या मादीला गंगापूरच्या रोपवाटिकेत हलवले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
Nashik Leopard Rescue in Artillery Centre