नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील खुटवडनगर परिसरात असलेल्या माहेर घर मंगल कार्यालयात दरवर्षीप्रमाणे श्री कुलस्वामिनी जोगेश्वरी गुरुपौर्णिमा नामजप उत्सव साजरा केला जाणार आहे. यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. माहेर घर मंगल कार्यालयात शनिवार, १ जुलै २०२३ रोजी हा उत्सव होणार आहे.
उत्सव समितीचे अध्यक्ष भरत दुसे आणि लक्ष्मीकांत शिनकर आणि सचिव प्रवीण अलई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो. त्यास उदंड प्रतिसाद मिळतो. या उत्सवात खालील कार्यक्रम होणार आहेत.
३.०० ते ५.०० श्री दुर्गासप्तशती पाठ वाचन
५.०० ते ५.३० चहा /कॉफी
५.३० ते ८.३० गायनाचा कार्यक्रम
(श्री आबा चौधरी व श्री धीरज चौधरी गायक शिरपूर च्या रथाचे मानकरी खान्देश किंग ग्रुप ,शिरपूर )
८.३० ते ९.०० नामजप व नैवद्य महाआरती
९.०० ते १०.०० महाप्रसाद
श्री दुर्गासप्तशती पाठास बसणाऱ्या महिला भगिनींनी दुपारी २.४५ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुर्गासप्तशती पाठास बसणाऱ्या प्रथम येणाऱ्या २०० महिलांमध्ये ५ लकी ड्रा विजेत्या महिलांना पैठणी दिली जाणार आहे. माहेर घर या वास्तू मध्ये वर्षातून एकदाच श्री कुलस्वामिनी जोगेश्वरी गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्ताने श्री दुर्गासप्तशती चे पाठ वाचन होत असते त्यामुळे आपल्या सर्व समाज बंधू भगिनींनी (१६ कुलस्वामिनी ) यात सहभाग घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.