नाशिक – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफर व गैरव्यहार झाल्याची तक्रार नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक दिनकर पाटील व सुनील केदार यांनी ईडीकडे केली आहे. या तक्रारीत २० वर्षापासून गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. २०१३- २०१४ या वर्षाचा लेखा परिक्षण अहवालही देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एक वर्षाच्या लेखा परिक्षण अहवालात ५०० कोटीचा भ्रष्टाचार तर २० वर्षाचा आकडा हजारो कोटीचा असेल असेही नमूद करण्यात आले आहे. सदर बाब गंभीरपणे घेवून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावे अशी मागणी करण्यात आली आहे. ही आहे तक्रार….
पुराव्यासह कागदपत्रे सादर केले
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत २० वर्षांपासून भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अफरातफर होत असुन आम्ही १८ वर्षांपासून निवेदने, मोर्चे, आंदोलने करत होतो. अनेक वेळा चौकशा झाल्या पण राजकीय दबावामुळे कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे आम्ही ईडीकडे पुराव्यासह कागदपत्रे सादर केले आहेत. आजपर्यंत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आम्ही प्रवर्तन निर्देशालयाला दिली आहे.
सुनील केदार
भाजप सरचिटणीस, नाशिक महानगर जिल्हा