कोकण कृषी पर्यटन विकास संस्थेद्वारे कोकण हापुस आंबा विक्री केंद्र सुरू
नाशिक – कोकण कृषी पर्यटन विकास संस्था ही गेली १५ वर्षे सातत्याने कोकणातील शेतकर्यांना एकत्रित करुन आंबा महोत्सवाचे आयोजन करीत असते. यंदा लाॅकडाऊनमुळे आंबा महोत्सव आयोजित करणे शक्य नाही. मात्र नाशिककरांना कोकणातील शेतकर्यांच्या बागेतील नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा एका छोट्याशा विक्री केंद्रावर उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच नाशिक शहर परीसरात होम डिलीवरीही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही सेवा केवळ बुकींवरच अवलंबून असणार आहे.
कोकण कृषी पर्यटन विकास संस्थेचे संचालक दत्ता भालेराव यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ३ जुन रोजी झालेल्या निसर्ग वादळात आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबाही यंदा तसा कमीच आहे. तरीही कोकणातील ओरीजनल हापुस आंबा आंम्ही पुरवणार आहोत याचे कारण म्हणजे फक्त खंड पडू नये ऐवढाच आहे. बाहेर मोठ्या प्रमाणावर कर्नाटक, गुजरातचा आंबा कोकणातील हापुस आंब्यात मिक्स करुन विक्री चालु आहे. वाशी व गुलटेकडी मार्केट यार्डात अनैक छापे अधिकार्यांनी टाकले व असा आंबा जप्त केल्याचे वृत्त आपण वाचत, बघत असाल. मात्र आमच्याकडे कोकणातील निवडक आंबा उत्पादक शेतकर्यांचाच आंबा असल्याने आंम्ही केवळ गवतात नैसर्गिकरीत्याच आंबा पिकवत असल्याने आमच्या आंब्याची गोडी जास्त असते, असे भालेराव म्हणाले.
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर कृपया संपर्क करुन आंबा वजन, दर, होम डिलीवरी इ. याबाबत माहिती उपलब्ध आहे, असे भालेराव यांनी सांगितले आहे.
कोकण कृषी पर्यटन विकास संस्था, नाशिक
७०३०८९४४११ किंवा ९६८९०३८८८० किंवा ९४२३९६८८६८