नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील प्रभाग क्रमांक २४ मधील कर्मयोगीनगर येथील नाल्यावरील पुलाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. तेथून रहदारी सुरू झाली आहे. दीड वर्षांच्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनसह रहिवाशांनी गुरुवारी, १३ एप्रिल २०२३ रोजी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करीत पेढे वाटले.
कर्मयोगीनगर, पाटीलनगर, कालिका पार्क, तिडकेनगर, त्रिमूर्ती चौक, खोडे मळा, पांगरे मळा, खांडे मळा, मंगलमूर्तीनगर, कोठावळे मळा, बोंबले मळा, बडदेनगर, पाटील पासुडी, उंटवाडी आदी भागातील रहिवाशांना नवीन व जुने सिडको भागात जाण्या-येण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत होते. नाल्यालगतच्या रहिवाशांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. येथे पूल बांधण्यात यावा, यासाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने सप्टेंबर २०२१ पासून प्रयत्न सुरू करण्यात आले.
निविदा काढण्यापासून तर काम सुरू होण्याचे आदेश निघावे, प्रत्यक्ष काम सुरू व्हावे, यासाठी सतत निवेदने देवून पाठपुरावा करण्यात आला. नाल्यात उतरून रहिवाशांसह आंदोलन करण्यात आले. आयुक्त व संबंधित अधिकार्यांच्या वेळोवेळी शिष्टमंडळासह भेटी घेण्यात आल्या. तब्बल दीड वर्षांच्या प्रयत्नांनंतर या पुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. तेथून रहदारी सुरू झाली आहे. प्रयत्नांना यश आले, गैरसोय दूर झाली, यामुळे रहिवाशांनी गुरुवारी, १३ एप्रिल रोजी ढोल-ताशांच्या गजरात, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, संगीता देशमुख, धवल खैरनार, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, रवींद्र सोनजे, संजय टकले, अशोक पाटील, डॉ. शशीकांत मोरे, शांताराम मोरे, अशोक गाढवे, मनोज वाणी, मकरंद पुरेकर, मगन तलवार, विजय पैठणकर, प्रभाकर बाविस्कर, तुकाराम मालपुरे, बाळासाहेब दिंडे, श्रीराम धुळे, अनंत पाटील, राहुल कदम, संग्राम देशमुख, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, शीतल गवळी, अर्चना काठे, वृषाली ठाकरे, स्मिता गाढवे, नीलिमा चौधरी, कल्पना सूर्यवंशी, कांचन महाजन, स्वाती वाणी, रेखा भालेराव, ज्योत्स्ना जाधव, विजया पाटील, छाया शिरूडे, प्रज्ञा मालपुरे, अरुणा मालपुरे, उषा पैठणकर, माया पुजारी, विजया पाटील, पुष्पा धुळे, सुनंदा वाणी, वनिता अक्करते, मंदा बेंद्रे, रुपाली पाटील, सुवर्णा सोनवणे, सुशीला पाटील, श्रुती लांबट, इंदिरा देशमुख, रत्ना कोठावदे, वंदना बागुल, रंजना मयुरेश, निर्मला चौधरी, सुरेश बोरसे, भास्कर चौधरी, दिलीप जगताप, दिनेश पाटील, मनोज अट्रावलकर, नितीन जाधव, ललीत देशावरे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, रहिवाशी हजर होते.
Nashik Karmayogi Nagar Bridge Work Complete