नाशिक – नाशिककरांचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचे दर्शन नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून नाशिककरांना होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरोना नियम पाळण्यासाठी ऑनलाईन दर्शन पास उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या पाससाठी १०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास कडाडून विरोध झाल्याने अखेर आता हे शुल्क रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे स्वागत होत आहे. राज्य सरकारने धार्मिक स्थळांसाठी जे नियम सांगितले आहेत त्याचे कसोशीने पालन केले जाणार आहे. कालिका देवी संस्थानच्या www.kalikamandirtrust.org या वेबसाईटवर दर्शन पाससाठी अर्ज करता येईल. ६५ वर्ष वयापुढील वृद्ध आणि १० वर्षाच्या आतील बालकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. पहाटे ३ ते सकाळी ६ या वेळेत महिलांना दर्शनासाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. कालिका यात्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला असून मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून दर्शन पासचे बुकींग आजपासूनच सुरू झाले आहे. दर्शन पास मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
www.kalikamandirtrust.org