मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पंतप्रधान नागरी सेवा उत्कृष्टता पुरस्कार प्रदान…

by Gautam Sancheti
एप्रिल 21, 2025 | 8:13 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250421 WA0294

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या 12 प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी शर्मा यांना हा पुरस्कार ‘जिल्ह्यांचा समग्र विकास’ श्रेणीत मिळाला.

17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त आज विज्ञान भवन येथे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागा मार्फत या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याने आयुष्मान भारत, पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, उज्वला योजना, मुद्रा योजना, पोषण आहार योजना, स्वनिधी योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना यासह केंद्र सरकारच्या 12 प्रमुख योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीत राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात नाशिकच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत शर्मा यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023 मध्ये करंडक, मानपत्र आणि 20 लाख रुपये प्रोत्साहन निधी असे पुरस्काराचे स्वरुप असून, हा निधी नाशिक जिल्ह्यातील लोककल्याणकारी प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोगात आणण्यात येईल.

सिव्हिल सर्व्हंट्स हेच बदलाचे वाहक – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल सर्व्हंट्सना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी सिव्हिल सेवेला “समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन” म्हणत कार्यक्षमता, पारदर्शकता, EQ-TQ आणि नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘Nation First – Always First’ या मंत्रासह ‘विकसित भारत’च्या दिशेने मार्गदर्शन केले. यावेळी 2023-24 मधील उत्कृष्ट प्रशासकीय उपक्रम असलेल्या ई-बुक्सच्या मालिकेचेही अनावरण करण्यात आले.
या पुरस्कार वितरण समारंभात डॉ. जितेंद्र सिंग-केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, श्री.टी. व्ही. सोमनाथन-कॅबिनेट सचिव, श्री. व्ही. श्रीनिवास- पंतप्रधानांचे प्रधान सचिव (पहिले) श्री. शशिकांत दास- पंतप्रधानांचे प्रधान सचिव (दुसरे), वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व सनदी अधिकारी उपस्थित होते.

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट
‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023’ ने (PM Excel Public Administration Award) सन्मानित झाल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. या वेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या मा. उपसंचालक अमरज्योत कोर अरोरा यांनी श्री. शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नाशिक जिल्ह्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समग्र विकासाच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी करत देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या आणि आदिवासीबहुल भागांचा समावेश असलेल्या नाशिक जिल्ह्याने पाण्याची टंचाई, भौगोलिक विस्तार आणि इतर स्थानिक अडचणींवर मात करत केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.

या यशाविषयी बोलताना जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, “हा पुरस्कार नाशिकच्या जनतेचा आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान आहे. सॅचूरेशन अप्रोचचा अवलंब करत आम्ही प्रत्येक योजनेला गती दिली व नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. हा पुरस्कार आम्हाला यापुढेही अशी प्रेरणा देत राहील.”

श्री. शर्मा यांनी केंद्र सरकारच्या योजनांना स्थानिक गरजांशी समन्वय साधून प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, “नाशिक जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या योजनांत नागरिकांचा सक्रीय सहभाग आणि प्रशासनाची अथक मेहनत आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला भविष्यातील कामासाठी अधिक ऊर्जा व प्रोत्साहन मिळेल.” तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू’ या दृष्टिकोनानुसार राबवण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी जिल्हास्तरावर प्रभावीपणे करण्यात येईल, असा निर्धारही श्री. जलज शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक बाह्यवळण प्रकल्पासह हे प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Next Post

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
oath as State Chief Information Commissioner 0 41 1024x506 1

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ

ताज्या बातम्या

Nashik city bus 6 e1723473271994

नाशिकरोड ते गिरणारे हा नवीन बस मार्ग सुरु….

ऑगस्ट 5, 2025
Supriya Sule e1699015756247

खा. सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरासाठी मुख्यमंत्र्याकडे केली ही मोठी मागणी…

ऑगस्ट 5, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारताचा विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक…२०२४ मध्ये इतक्या कोटी प्रवाशांची नोंद

ऑगस्ट 5, 2025
पर्यटन सुरक्षा दल नेमण्याची कार्यवाही करणेबाबत बेठक 1 1024x615 1

आता गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पाँईट येथे पर्यटन सुरक्षा दल…

ऑगस्ट 5, 2025
election6 1140x571 1

बिहारमध्ये राजकीय पक्षांकडून मतदार यादीबाबत चार दिवसात दावे-हरकतींचे १,६०,८१३ अर्ज….

ऑगस्ट 5, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने बनावट चकमक प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दिली जन्मठेपेची शिक्षा…इतका दंडही ठोठावला

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011