नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली त्यानुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया ही आजपासून राबवण्यात येणार आहे. यामध्ये २० संवर्गातील तब्बल १०३८ पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असून यासंदर्भातील जाहिरात ही ५ ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली होती, या जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या १०३८ जागांसाठी तब्बल ६४ हजार ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. या भरतीच्या परिक्षा शुल्कापोटी ५ कोटी ७५ लाख ४३ हजार १०० रुपये जमा झाले आहे.
सदर परीक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, अन्यथा अशी फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
कुठल्या पदासाठी किती अर्ज –
(कंत्राटी) ग्रामसेवक – ५० – अर्ज संख्या – ११७२८
आरोग्य पर्यवेक्षक – ३ – अर्ज संख्या ९१
आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – ५९७ – अर्ज संख्या – ३९५४
आरोग्य सेवक (पुरुष) ४० % – ८५ – अर्ज संख्या – १७५७९
आरोग्य सेवक (पुरुष) ५० %– १२६ – अर्ज संख्या – ६४८८
औषध निर्माण अधिकारी – २० – अर्ज संख्या – ५०५७
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १४ – अर्ज संख्या – २६०७
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – २ – अर्ज संख्या – ३३७
विस्तार अधिकारी(शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २) – ७ अर्ज संख्या – १०४७
वरिष्ठ सहाय्यक – ३ अर्ज संख्या – १७७३
पशुधन पर्यवेक्षक – २८ – अर्ज संख्या – ७७४
कनिष्ठ आरेखक – २ – अर्ज संख्या – ४१
कनिष्ठ लेखा अधिकारी – १ – अर्ज संख्या – ४८
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – ५- अर्ज संख्या – ८६३
/ कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) – २२ – अर्ज संख्या – २६६७
मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका – ४ – अर्ज संख्या – ६७७
कनिष्ठ यांत्रिकी – १– अर्ज संख्या – ४४
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) इवद/ग्रा.पा पु. – ३४ अर्ज संख्या – ५२६८
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य ) इवद/ग्रा.पा पु. – ३३ – अर्ज संख्या – २९४२
लघुलेखक (उच्च श्रेणी) – १ – अर्ज संख्या – ९५
एकूण जागा = १०३८ अर्ज संख्या – ६४०८०
Nashik Zilla Parishad Mega Recruitment 64 thousand 80 applications for 1038 seats
Nashik Jilha Parishad Recruitment Post Applications Vacancy Job Unemployment