नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २९ ऑगस्ट पासून समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील राज्य सरकारी ,नीम सरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी जुनी पेंशन व प्रलंबित न्याय मागण्यासाठी बेमुदत संपावर आहे. या संपाबाबतची नोटीस निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आली.
ही नोटिस देताना जिल्हाध्यक्ष दिनेश वाघ, जिल्हासंपर्क प्रमुख श्यामसुंदर जोशी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संगटनेचे ज्ञानेश्वर कlसार, महसूल कर्मचारी संगटनेचे तुषार नागरे, पाट बंधारे विभागचे उमेश देशमाणकर, तलाठी संघटना रविंद्र पवार तात्या, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राजेंद्र अहीरे , आरोग्य विभागाचे सागर गांगुर्ड, कोषागार कर्मचारी संघटनेचे उल्लास गायकर,दूध डेयरी कर्मचारी संघटनेचे बाळासाहेब गांगुर्डे, भगवान काकड , किशोर गरुड, माहिती जनसंपर्क कर्मचारी संघटनेचे मनोज अहीरे, निलेश गवळी, भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेचे मिलिंद जगताप ,धर्मदाय आयुक्त कर्मचारी संघटनेचे विनय जाधव व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.