नाशिक – कोरोनाच्या लढ्यात सर्व नाशिककर एकवटले असून शहरात जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सर्व संघटनांनी एकत्र येत जनता कर्फ्यूची हाक दिली आहे. आजपासून सुरू झालेला हा जनता कर्फ्यू पुढील १० दिवस कायम असणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच कलम १४४ लागू केले आहे. केवळ जीवनावश्यक बाबींनाच त्यात सूट देण्यात आली आहे.
यांनी दिला पाठिंबा
नाशिक सिटीझन्स फोरम
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर
क्रेडाई
ट्रान्सपोर्ट असोसिएशन
हार्डवेअर अँड पेंटस् मर्चंट असोसिएशन
नाशिक सराफ असोसिएशन
आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशन
—
असा आहे जनता कर्फ्यू
– सोमवार दि. १९ एप्रिल २०२१ पासून प्रारंभ
– आगामी दहा दिवस जनता कर्फ्यू राहणार
– स्वयंस्फूर्तीने नाशिककर यात सहभागी होऊ शकतात
– अत्यावश्यक सेवेत असलेल्या भाजीपाला, फळे व दुध विक्रेते हे सकाळी ७ ते १० या वेळेत उपलब्ध असतील
– किराणा दुकाने सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत सुरू राहतील
—