नाशिक – बातमीचे हेडिंग वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले ना. पण हो हे खरे आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक नवा विक्रम नोंदवित आहेत. सद्यस्थितीत शहरात पेट्रोल हे १०९ रुपये तर डिझेल ९९ रुपयांवर पोहचले आहे. ही बाब सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ देणारी ठरत आहे. त्यामुळेच आता या दोन्ही इंधनांना पर्याय असलेल्या सीएनजीकडे वाहनधारकांनी आपला मोर्चा वळविला आहे. शहर परिसरात सीएनजी पंपही उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सीएनजी पंपांबाहेर वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. जेल रोड, पंचक, नाशिकरोड परिसरातील सीएनजी पंपाबाहेर सध्या हे चित्र दिसून येत आहे. सीएनजी पंपांवर एवढी गर्दी होण्याचे कारण म्हणजे सीएनजीचा पुरवठा हे आहे. सीएनजीची मागणी प्रचंड असली तरी त्या तुलनेत पुरवठा अत्यल्प असल्याचे पंप चालकांचे म्हणणे आहे. बघा हा व्हिडिओ
व्हिडिओ – सचिन मोरे