नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील इंडिया बी संघातर्फे सलामीला फलंदाजीला येत प्रभावी कामगिरी करतांना इंडिया ए वरील विजयात मोठा वाटा उचलला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी चौरंगी मालिका सध्या वायझॅग इथे सुरू आहे. त्यात दुसर्या सामन्यात ईश्वरीच्या इंडिया बी संघाने इंडिया ए ने दिलेल्या ११७ धावांचे आव्हान १७.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. त्यात ईश्वरी सावकारने केवळ ३२ चेंडूत ६ चौकारांसह ३६ धावांचे बहुमोल योगदान दिले. सलामीला फलंदाजी करणारी ईश्वरी धावचीत झाली तेव्हा संघाच्या १०.१ षटकात ५४ धावा झाल्या होत्या.
त्याधीच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेवरील विजयात देखील ईश्वरी सावकारने मोठा वाटा उचलला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी चौरंगी मालिका सध्या वायझॅग इथे सुरू आहे. त्यात पहिल्या सामन्यात ईश्वरीच्या इंडिया बी संघाने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १२५ धावा केल्या. त्यात ईश्वरी सावकारने ४८ चेंडूत ३० धावांचे बहुमोल योगदान दिले. ईश्वरीने जी त्रिशा बरोबर दुसर्या गड्यासाठी ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली व संघाच्या धावसंख्येला आकार दिला. उत्तरदाखल श्रीलंका संघ ९ बाद ११३ पर्यंतच मजल मारू शकल्यामुळे इंडिया बी संघाने १२ धावांनी विजय मिळवला. इंडिया बी चा यानंतर १७ नोव्हेंबरला वेस्ट इंडीज बरोबर सामना नियोजित आहे.
ईश्वरीच्या या प्रभावी कामगिरीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात उत्साहमय वातावरण निर्माण झाले असून, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, पदाधिकारी, सदस्य व प्रशिक्षक यांनी ईश्वरी सावकारला स्पर्धेतील पुढील सामन्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Nashik Ishwari Sawakar Cricket Series Performance