विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोना विषाणूच्या संसर्गावरुन राज्य सरकारने रंगनिहाय वर्गवारी केली आहे. त्यात पिवळा, हिरवा आणि लाल क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रनिहाय कोरोना निर्बंधांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे नाशिक नक्की कोणत्या क्षेत्रात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहर व जिल्ह्यातील सद्यस्थितीत लक्षात घेता ते स्पष्ट झाले आहे. नाशिकमधील कोरोना बाधितांचा दर (पॉझिटिव्हिटी रेट) हा १० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे नाशिकचा समावेश हा आता हिरव्या क्षेत्रात (ग्रीन झोन)मध्ये झाला आहे. परिणामी, येत्या ३१ मे पर्यंत लागू असलेले निर्बंध नाशकात येत्या १ जून पासून शिथील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही बाब उद्योग आणि व्यवसायाला चालना देणारी ठरणार आहे.
—