बुधवार, ऑक्टोबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जलसंपदा आढावा बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

मार्च 18, 2022 | 6:34 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220318 WA0020

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा भूसंपादन तसेच नाशिक पाटबंधारे विभागाकडील नाले दुरुस्ती, पुररेषा नियंत्रण, ओझरखेड कालवा चारी दुरूस्ती, विस्तारीकरण व पुल बांधणी, पालखेड डावा कालव्यावर एस्केप गेट बसविणे इत्यादी कामे शेतकऱ्यांना प्राधान्य देवून वेळेत पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांसाठी शासकीय पातळीवर मान्यतेची आवश्यक आहे, त्या कामांबाबत कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यास शासन स्तरावर सर्वोतपरीने मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, चांदवडचे प्रांताधिकारी सी.एस. देशमुख, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, नाशिक पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नाशिक लघु पाटबंधारे विभागाचे सचिन पाटील, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप तसेच जयदत्त होळकर, मोहन शेलार, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जलसंपदा विभागांतर्गत प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून समन्वयाने व नियोजनपुर्वक काम करणे आवश्यक आहे. तसेच ज्या भागात भूसंपादनाचा विषय येत असेल त्या ठिकाणी एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून दर निश्चित करण्यात यावा. ज्या ठिकाणी कामे चालु किंवा प्रलंबित आहेत अशा ठीकाणी प्रत्यक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी क्षेत्रिय भेट देवून तेथील प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहेत.

या कामांचा घेतला आढावा
दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा काजीसांगवी ता. चांदवड येथील भूसंपादन, नांदूरमध्यमेश्वर ते संवत्सर, खेडलेझुंगे, कानळद पूररेषा निश्चित करणे, रुई, देवगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, वाकद शिरवाडे या परिसरात नाल्यांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची दरवर्षी होणारी नुकसान टाळण्यासाठी करावयाची कार्यवाही, देवगाव, रुई, कोळगाव, कानळद (देवगाव) गोदावरी कालवा १५ नंबर व नाला ७ नंबर मोऱ्यापर्यंत खोदकाम करून चर काढणे (पावसाचे पाणी), गोदावरी डावा तट कालवा साखळी क्रमांक २०५०० ते २१३०० मीटर. मध्ये विशेष दुरुस्ती व अंतर्गत कालव्यास अस्तरीकरण करणे या कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळणेबाबत कामांचा प्रस्ताव तयार करून तो तात्काळ सादर करण्यात यावा, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी डावा कालवा २५ नंबर चारी जऊळके पासून मुखेड पर्यंत स्वतंत्र करावी, गोदावरी कालवा-चारी क्रमांक ३ मुखेड येथे पाणी मिळत नसल्याने दुरुस्ती करणे, पालखेड डावा कालव्यावर थेट विमोचक बसविणे तसेच ओझरखेड कालव्यातून खडक माळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी ४९ किलो मीटर मध्ये एस्केप गेट बसविणे या कामांचा प्रस्ताव तयार करून ही कामे लवकर सुरू करण्यात यावी. तसेच रयत शिक्षण संस्था विंचूर येथे पालखेड डावा कालवा भूमिगत करणेबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, हे कामही लवकरच सुरू करण्यात येईल.

पुणेगाव दरसवाडी कालवा किलो मीटर १ ते २५ विस्तारीकरण आणि सदर कालव्यावरील वणी येथील बोगद्याच्या विस्तारीकरणाचे काम, पुणेगाव-दरसवाडी कालवा व दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे अपूर्ण काम यांत्रिकी विभागाकडून पूर्ण करणे, ओझरखेड कालवा दोन उन्हाळी आवर्तने देण्याबाबत. (खडकमाळेगाव), पालखेड डावा कालवा १११ कि.मी. मध्ये कालव्यावर सोनवणे वस्तीकडे जाण्यासाठी पूल बांधणे या कामांचा आढावा घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमधील कोरोना निर्बंध केव्हा हटणार? पालकमंत्री भुजबळ म्हणाले….

Next Post

नाशिक जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
Next Post
carona 11

नाशिक जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011