नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी बुधवार, २ नोव्हेंबर पासून तालुकानिहाय निवड प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या दिवशी मालेगाव व इगतपुरी येथे त्याचा शुभारंभ होत आहे. या स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडूंना जिल्हास्तरावर आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. खास या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध निवड समिती सदस्य जिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यात जाऊन निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक तालुक्याचा अंतिम संघ निवडणार आहेत. २ ते ८ नोव्हेंबर तालुकानिहाय चालणार्या या निवड प्रक्रियेचा तपशील आणि संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे
Nashik Inter District Cricket Team Selection
Sports NDCA