नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नाशिकमध्ये उद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक होण्यासाठी आपण पाठपुरावा करण्यात येईल. त्यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि उद्योजक तसेच विविध कामगार संघटना यांची बैठक घेऊन उद्योजक आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
नाशिक मधील औद्योगिक शांतता आणि उद्योग वाढीबाबत मी नाशिककर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांनतर भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी डॉ.उदय खरोटे, समन्वयक संजय कोठेकर, आयमाचे मनिष रावल, श्रमिक सेनेचे सुनील बागुल , सिटूचे डॉ. डी. एल. कराड, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे व्यवस्थापक अशोक सोनावणे, नितीन जाधव, निपमचे माजी अध्यक्ष जनार्दन शिंदे, राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले की, नाशिकमध्ये उद्योगांसाठी अनुकूल असे वातावरण असून याठिकाणी अधिकाधिक उद्योग यावे यासाठी आपले प्रयत्न आहे. यामध्ये केवळ प्रदूषण कारी जे उद्योग आहे त्यांना नाशिक शहरातील औद्योगिक क्षेत्रात विकसित न करता जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतीत विकसित करण्यास प्राधान्य आहे. त्यातून नाशिकचे हवामान आपण टिकवून ठेऊ शकतो. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन, आयटी यासह इतर उद्योग अधिक वाढतील यासाठी प्रयत्न असून शासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, नाशिकमधील औद्योगिक शांतता व उद्योग वाढीसाठी उद्योजक तसेच कामगार संघटना एकत्र येऊन मी नाशिककर या चळवळीत काम करत आहे. या चळवळीचे आपण स्वागत करत असून उद्योजक आणि कामगार यांच्या समन्वयातून नाशिकचा औद्योगिक विकास शक्य होणार आहे. यासाठी उद्योगांच्या असलेल्या अडचणींचा अभ्यास करण्यात येऊन त्यादृष्टीने नियोजन करण्यात प्राधान्य देण्यात येईल. नाशिकच्या औद्योगिक शांततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्हा शांतता समिती पुनर्गठीत करण्यात येईल. यामध्ये उद्योजक, कामगार संघटना, उद्योजक संघटना, समाजसेवी संघटना यांच्या प्रतिनिधींना एकत्रित घेऊन समिती तयार करण्यास प्राधान्य देण्यात येईल. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील. त्यानंतर आपण शासन स्तरावर नवीन उद्योजकांशी संपर्क करून गुंतवणूक वाढविण्यास प्राधान्य देऊ असे त्यांनी सांगितले.
नाशिक मधील औद्योगिक शांतता आणि उद्योग वाढीबाबत मी नाशिककर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिक येथे भेट घेतली. नाशिकमध्ये अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. #महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून नाशिकमध्ये उद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक होण्यासाठी आपण पाठपुरावा pic.twitter.com/rs3B33sGSF
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 30, 2022