गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये आयकर विभागाचे छापे; बांधकाम व्यावसायिकांच्या तब्बल ७५ ठिकाणांवर पथक दाखल… अनेकांचे धाबे दणाणले (व्हिडिओ)

by India Darpan
एप्रिल 20, 2023 | 11:21 am
in मुख्य बातमी
0
20230420 112407

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात एकाचवेळी १० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी तब्बल ७५ ठिकाणांवर हे छापे टाकले आहेत.

नाशिकच्या मेनरोडवर तसेच, या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या पथकांनी एकाचवेळी बांधकम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, फार्म हाऊस आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला आहे. ७४ ठिकाणांवर जवळपास १५० पेक्षा अधिक आयकर अधिकारी व कर्मचारी दाखल असल्याचे सांगितले जाते. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद , पुणे , मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते.

आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठीच खळबळ उडाली आहे. अचानक हे छापे पडले. त्यातच शहरातील अत्यंत नामांकीत बांधकाम व्यावसायिक  या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे अद्याप समजू शकलेले नाही. आज सायंकाळपर्यंत यासंदर्भात अधिकृत माहिती मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या बांधकाम व्यावसायिकांकडील सर्व कागदपत्रांची छाननी, बँक खात्यांचा तपशील अशा सर्वच बाबींची पडताळणी या पथकांनी सुरू केली आहे.

Nashik Income Tax Department Raid Real Estate Sector

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१५ वर्षे पगारच झाला नाही… आता मिळाला तर नियतीनं गाठलं… शिक्षकासह मुलाचा अपघातात मृत्यू… दुर्देवी घटनेची सर्वत्र चर्चा

Next Post

राहुल गांधींना मोठा झटका; सूरत न्यायालयाने दिला हा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
Rahul Gandhi 1 e1706697653225

राहुल गांधींना मोठा झटका; सूरत न्यायालयाने दिला हा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011