नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इर्शाळवाडीची घटना ताजी असतांना इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा वरील काही भाग कोसळला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. पण, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. इगतपुरीचे तहसीलदार घटनास्थळावर पोहचले आहेत, किल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणा-या नागरिकांना गावात सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना आपआपल्या तालुक्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी केले आहे. हा किल्ला कोसळतांचा थरार कॅमेरात कैद झाला आहे.