इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात लाचखोरांचा सुळसुळाट झाला आहे. आता आणखी एक लाचखोर सापडला आहे. सचिन काशिनाथ म्हस्के असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तालुक्यातील सांजेगाव आणि मुरंबी येथे तो तलाठी आहे. एका शेतकऱ्याकडून २० हजार रुपयाची लाच स्विकारतांना तो लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याने त्याच्या अन्य ३ भागीदारांसोबत मुरंबी गावात जमीन खरेदी केली. सदर जमिनीच्या गाव नमुना ७/१२ महसूल अभिलेखावर् नोंद करण्यासाठी हा शेतकरी तलाठी कार्यालयात गेला. तेथे लाचखोर तलाठी म्हस्के याने २० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे शेतकऱ्याने तक्रार केली. त्याची दखल घेत सापळा रचला. आणि याच सापळ्यात लाचखोर म्हस्के अडकला. शेतकऱ्याकडून २० हजार रुपयांची लात स्विकारताना लाचखोर म्हस्के रंगेहाथ सापडला. त्यानंतर लाचखोर म्हस्के विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सापळा अधिकारी
संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक संपर्क क्रमांक – 8605111234
*सापळा पथक-
पो. हवा. एकनाथ बाविस्कर
पो. ना. प्रकाश महाजन
पो. शि. नितीन नेटारे
मार्गदर्शक
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक संपर्क क्रमांक – +919371957391
मा. श्री. माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक. संपर्क क्रमांक – 9404333049
*मा.श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. संपर्क क्रमांक – +917977847637
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.