नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील डॅाक्टराविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड येथील मॅग्नम हॉस्पिटलमध्ये उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी एक रुग्ण दाखल झाला. मात्र, त्याचा डावा पाय कापण्यात आल्याच्या तक्रार रुग्णाने केली. त्यानंतर डॉ. विपुल काळे या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मॅग्नम हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने केलेल्या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. अशी कुठली घटना घडली नसून शस्त्रक्रिया करताना डॉक्टर काळे यांच्या हातातून शस्त्रक्रिया दरम्यान वापरल्या जाणाऱ्या बिलेट खाली पडला. त्यामुळे रुग्णाला दुखापत झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दसक गावात राहणारे सुभाष काशिनाथ खेलूकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालय अहवालावरून उपनगर पोलिस ठाण्यात कलम ३३७ व ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबियांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दोन ते तीन महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल झाला. आता हॉस्पिटलवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी खेलूकर यांनी केली आहे. डॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच आपण दोन्ही पायांनी अधू झाल्याचे खेलूकर यांनी सांगितले.
डावा पाय कापण्यात आल्याचा आरोप
खेलूकर हे इंडिया सेक्युरिटी प्रेस मध्ये कामाला आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात त्यांच्या पायात शस्त्रक्रिया करून लोखंडी रॉड टाकण्यात आला होता. हाच रोड काढण्यासाठी मॅग्नम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. उजव्या पायात शस्त्रक्रिया करताना त्यांचा डावा पाय कापण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे
या घटनेला दोन महिने उलटूनही हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे विरोधात पोलिसात गुन्हा दाखल न झाल्याने सुभाष खेलूकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण साठी बसले होते. त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांनी डॉक्टर विरोध आणि हॉस्पिटल विरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.
nashik hospital doctor patient surgery fir
nashik road magnum hospital