नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील अधिष्ठाता (अतिरिक्त कार्यभार) डॉ. मृणाल पाटील यांनी या संदर्भात पुढिल माहिती दिली आहे.
सौ. प्रियंका सुनिल बोडके वय २३ वर्षे यांच्या नवजात बालकाच्या मृत्यूची चौकशी करणेकरीता नेमलेल्या चौकशी समितीकडून प्राप्त झालेल्या अभिप्रायावरुन सीझर करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक कारण नव्हते. त्यामुळे नैसर्गिक प्रसुतीचा मार्ग अवलंबीला गेला व प्रसुती दरम्यान बाळाच्या मानेभोवती नाळेचे दोन वेढे घट्ट आवळलेले असल्याचे आढळून आले व त्यामुळे बाळ दगावले असण्याची शक्यता अहवालामध्ये वर्तवण्यात आली आहे.