शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशकात १५ लाखांपासून ४ कोटींपर्यंतचे घर घेण्याची संधी; २२ ते २५ डिसेंबर भव्य गृह प्रदर्शन

नरेडकोच्या होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाचा डॉ. निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार उदघाटन

डिसेंबर 15, 2022 | 6:22 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221215 WA0211 e1671108055102

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे नाशकातील सगळ्यात भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशन ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी आणि नरेडको नॅशनल प्रेसिडेंट श्री.राजन बांदेलकर यांच्या हस्ते होणार आहे.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार तसेच नरेडकोच्या होमथॉन एक्स्पो २०२२ या प्रदर्शनाची ब्रँड ॲबेसॅडर अभिनेत्री प्राजक्ता माळी ती देखील या प्रदर्शनाला भेट देणार आहेत, अशी माहिती नरेडको अध्यक्ष अभय तातेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरीकांना उपलब्ध होईल,अल्प व मध्यम उत्पन्नगटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी १५ लाखांपासून ते ४ कोटी रुपया पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.अशी माहिती नरेडकोच्या प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले

हे प्रदर्शन ४ डोममध्ये उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून त्यात १२५ हून अधिक स्टॉल्स असतील. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साहित्ये यांये स्टॉल्सही येथे असतील कोणत्याही स्टॉल वर घर बुक करणाऱ्यास लगेचच नरेडको तर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे.तसेच प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांचीही नरेडको तर्फे लकी ड्रॉद्वारे भाग्यवंताला चांदीचं नाणं दररोज मिळणार आहे असे नरेडको चे सचिव सुनील गवादे यांनी सांगितले.

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे असून सह प्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो,केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रदर्शनात मोफत प्रवेश
प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही मात्र प्रवेशकरण्यापूर्वी नागरीकांना क्यू आर कोड द्वारे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.हे प्रदर्शन डोंगरे वसतिगृह मैदानावर २२ ते २५ डिसेंबर पासून नागरीकांना खुले असून जास्तीतजास्त नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्रदर्शनाचे सह समन्वयक शंतनू देशपांडे यांनी केले आहे.

ग्रीन एक्झिबिशन
नरेडकोच्या ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” या प्रदर्शनात सामाजिक बांधिलकी म्हणून एक अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे.या प्रदर्शनामध्ये जमा झालेला प्लास्टिकचा कचरा पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल मध्ये भरला जाणार असून या बॉटल्स ग्रामीण भागात बांधकामासाठी वापरला जाणार आहे.तसेच या नरेडकोच्या प्रदर्शनात ब्रँडिंगसाठी वापरण्यात आलेले फ्लेक्स होर्डिंग गोळा करून त्याचे छत बनवून गरिब लोकांच्या घरावर छप्पर म्हणून लावण्यात येणार आहे.सामाजिक बांधिलकीतून उपक्रम करणारी नरेडको ही पहिलीच संस्था असणार आहे.असं नरेडकोचे सुनील गवादे यांनी सांगितले. सूत्रसंचालन नंदन दीक्षित यांनी केले. पत्रकार परिषदेस नरेडकोच्या नाशिकचे सचिव सुनील गवादे, सह समन्वयक शंतनू देशपांडे यांच्यासह पुरुषोत्तम देशपांडे,भाविक ठक्कर, अविनाश शिरोडे, अश्विन आव्हाड, श्रीहर्ष घुगे, प्रशांत पाटील, नितीन पाटील, मयूर कपाटे, भूषण महाजन उपस्थित होते.

Nashik Home Property Expo Naredco Homethon
Real Estate

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात होणार राज्यस्तरीय कृषी महोत्सव; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टरी एवढी वाढ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
mantralay with logo 1024x512 1

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टरी एवढी वाढ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011