नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज गुढीपाडवा व येत्या शनिवारी या शासकीय सुट्टींच्या दिवशी नाशिक शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू राहतील, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे.
नाशिक शहरातील पक्षकार,बिल्डर व वकील संघाने माहे एप्रिल 2023 पासून वार्षिक मूल्य दर तक्त्यात संभाव्य वाढीच्या दृष्टीने मार्च 2023 महिन्यातील शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी करीता शहरातील दस्त दुय्यम निबंधक कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालय क्रमांक 1 ते 7 सुरू ठेवण्यात आली आहेत.
या दिवशी सुरू राहतील निबंधक कार्यालये
क्र दिनांक सुट्टीचा दिवस
1. 22 मार्च 2023 गुढी पाडवा
2. 25 मार्च 2023 शनिवार
Nashik Gudhipadwa Holiday Government Office