मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

by India Darpan
मार्च 22, 2023 | 3:07 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230322 WA0002 e1679471233392

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या नाशिक जिल्हा सेवा समितीच्या वतीने गुढीपाडवा निमित्त नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत पारंपारिक चित्ररथ सहभागी झाले होते. हिंदू नववर्ष स्वागतासाठी जनम संस्थेच्या वतीने काढण्यात आली होती. काशी माळी मंगल कार्यालय येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जमन संस्थानाच्या उत्तर महाराष्ट्र उप पिठाचे महानिरीक्षक प्रदीप मालानी, नाशिक जिल्हा सेवा समिती निरीक्षक संदीप खंडारे, जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब चिकणे पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.

भजनी मंडळी, आदिवासी पावरी नृत्य, आदिवासी टिपरी नृत्य, राम पंचायतन , संत देखावा, वाघ्या मुरळी, बाल वेशातील छत्रपती शिवाजी महाराज, घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, मावळे यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. बेटी बचाव, बेटी पढावो चा संदेश देण्यासाठी स्वतंत्र चित्ररथ बनवण्यात आला होता. यात डॉक्टर, इंजिनिअर, वैमानिक, पोलीस वेशातील मुली सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीच्या अग्रभागी मोटर सायकल रॅली, निशानधारी, कळसधारी, तुळसधारी महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी हिरव्या, भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेतील महिला तसेच पुरुषांनी भगवे फेटे घातले होते. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा मुख्य रथ हे विशेष आकर्षण होते. काशी माळी मंगल कार्यालय येथून द्वारका सर्कल, सारडा सर्कल, दूध बाजार, दामोदर टॉकीज जवळून मेन रोड, रविवार कारंजा, विक्टोरिया पुलावरून मालेगाव स्टँड इथून रामकुंडावर यात्रेची सांगता करण्यात आली. राम कुंडावर गंगेची आरती, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची आरती करण्यात आली.

यात्रेत जिल्हा महिला अध्यक्षा संगीता वाळके, युवा अध्यक्षा अर्चना गवळी, हिंदू संग्राम सेना कर्नल संदीप कदम, जिल्हा सचिव जालिंदर थोरात, प्रसिध्दी प्रमुख हरिभाऊ हांडोरे, ज्ञानेश्वर कडलक, प्रकाश सानप, रोहित सानप, शिवा सूर्यवंशी, दीपक बारे, राहुल मोरे, सागर धात्रक, जनार्दन खाडे, विनोद घोडके, अमोल खोडे, पांडुरंग जगदाळे, योगेश शिरसाट, रंगनाथ पारधी, राहुल मौले, अमोल जेजुरकर, संतोष थोरात, हिरामण वाघ, रामदास गांगोडे, वसंत भाबड, हरीश कुलकर्णी,अशोक निवडुंगे, मंगला झनकर, जयश्री गवळे यांसह नाशिक जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते.

भाविकांची शिस्त
नववर्ष स्वागत यात्रेत श्री संप्रदायाच्या सेवेकरांची व भाविकांची शिस्त दिसून आली. यात्रा मिरवणुकीत कोठेही वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. हिंदू संग्राम सेनेने यात महत्वाची भूमिका बजावली. यास पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा सेवा समितीने दिलेल्या नियोजनानुसार अकरा वाजता सर्व भाविक गंगेवर पोहचले. यातून वेळेचे नियोजन देखील दिसून आले.

Nashik Gudhipadva Narendra Maharaj Swagat Yatra

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

Next Post

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011