नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज रामनवमी निमित्त काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मनोभावे श्रीरामाची पूजा केली. तसेच, हे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री भुसे म्हणाले की, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अतिशय जल्लोषाने उत्सव साजरा होत आहे. नाशिक जिल्हावासीय तसेच महाराष्ट्राच्या नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो. नाशिकची, राज्याची, देशाची प्रगती होवो, अशी प्रभुरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना केले.
अयोध्येला प्रभू श्रारीमाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर खा. हेमंत गोडसे, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, शिवसेना नेते अजय बोरस्ते यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
Nashik Guardian Minister Dada Bhuse Ramnavmi Kalaram Darshan