नाशिक – कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यात जीवानवश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या दुकानदारांवर विनाकारण कारवाईचा बगडा पोलिसांकडून उगारला जात आहे. त्यामुळे नाशिकमधील किराणा दुकानदार संतप्त झाले आहेत. आम्ही सहकार्य करीत असलो तरी आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, तसेच, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असा स्पष्ट इशाराच नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेने दिला आहे. यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून पोलिसांच्या कारवायांमुळे व्यापारी त्रस्त झाल्याचे त्यात म्हटले आहे.
संघटनेचे निवेदन असे