शनिवार, सप्टेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पोलीस अधिक्षकांच्या धडक कारवाया; मालेगावला बायोडिझेल पंपावर छापा तर पेठला अडोतीस लाखाचा गुटखा जप्त

by Gautam Sancheti
ऑगस्ट 17, 2021 | 8:56 pm
in स्थानिक बातम्या
0
sachin patil sp e1622476558812

नाशिक – राजकीय अथवा धनदांडग्यांच्या दबावाला न जुमानता जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेला सुरूंग लावणाऱ्या कुणावरही कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्यास ग्रामिण पोलीस सक्षम आहेत,असा संदेश पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी आणखी एका मोठ्या कारवाईतून अवैध प्रवृत्तींना दिला आहे.विशेष म्हणजे सोमवार दि.१६ आॕगस्ट रोजी जिल्हा हद्दीत पन्नास लाखाहून अधिक किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करून मालेगावमध्ये अनाधिकृतपणे बायोडिझेल पंप चालविणाऱ्या माजी आमदाराच्या भावाच्या मुसक्या बांधल्याने जिल्हा पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे. हुक्का पार्लर,रेव्ह पार्टीचे संचालकांवर कारवाई करतांना या परिघात कथित प्रतिष्ठेचे प्रदर्शन मांडणारे धनदांडगे,राजकीय सामाजिक क्षेत्रातील तथाकथीत प्रतिष्ठेचा बुरखा फाडीत दिवट्या पुत्रांवरही कारवाई करण्याचे धाडस दाखवले.कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अशा अवैध व्यवसायांवर कायद्याचा आसूड ओढण्याची मोहीम सुरूच असून या मोहीमेअंतर्गत सोमवारीही दोन मोठ्या कारवाया केल्या.

मालेगाव येथील माजी आमदाराच्या भावाने उभा केलेला बायोडिझेल पंपाचा अनाधिकृत व्यवसाय या कारवाईत उध्वस्त करण्याचे धाडस पोलीस अधिक्षकांनी दाखवले.हाॕटेलच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या अनेक दिवसापासून हा पंप बेकायदेशीरपणे सुरू होता.तथापी माजी आमदार कुटूंबाची मनी आणि मसल्स पाॕवरच्या जोरावर असलेली दहशत या पंपाला संरक्षण देत असल्याने इत्यंभूत माहीती असूनही स्थानिक पोलीस कारवाई करण्यास असमर्थ ठरत होते.ही बाब निदर्शनास येताच या पंपावर स्वतः पोलीस अधिक्षकांनी छापा टाकून २५ हजार लिटर बायोडिझल भरलेली टाकी तसेच बायोडिझेल तयार करण्यासाठी वापरले जाणाऱ्या रसायनाच्या पाच हजार लिटरच्या तीन टाक्या जप्त करून संबंधीतांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पेठ पोलीसांनीही सोमवारी केलेल्या मोठ्या कारवाईत ३८ लाख १९ हजार २०० रू.एव्हढ्या किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.एम एच १६ सीसी २८४२ या चार चाकी वाहनाचा संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता साड्यांच्या गाठींमध्ये खोटी बिले तयार करून महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.अधिक चौकशी अंती केसर युक्त विमल पान मसाला, लेबल नसलेली सुगंधी तंबाखू असा एकूण ३८,१९,२०० रू किंमतीचा माल १२ लाखाच्या चार चाकीतून वाहून नेला जात असल्याचे निदर्शनास आहे.याप्रकरणी पोलीसांनी पाचारण केलेले अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांच्या फिर्यादीवरून सुभाष नारायण पालवे,देवराई ता.पाथर्डी,जि.अहमदनगर,शिवाजी रामू कराड एमआयडीसी अहमदनगर या दोघांसह वाहन मालक विनीत गिरिधारीलाल जग्गी अहमदनगर यांच्याविरूध्द भादवि १८८,२७२,२७३,४२०,३४,३२८,अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ चे कलम २६(२) कलम २७,कलम ३०(२)(अ)सह कलम२६(२)(i),(v),३(१)(zz)(i),२७(३)(e) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयीतांसाह १२ लाखाची कार तसेच ३८,१९, ४०० रू किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा असा एकूण ५०,१९,४०० रू.चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक म्हणून पदभार स्वीकारतांना सचिन पाटील यांनी नाशिक जिल्ह्याची सर्वच क्षेत्रात असलेली गौरवशाली परंपरा बाधीत होईल अशा कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला जिल्हा पोलीस यंत्रणा पाठीशी घालणार नाही,अशी ग्वाही दिली होती. ही ग्वाही त्यानंतर जिल्हाभर होत असलेल्या पोलीस कारवाईने वास्तवात उतरत आहे. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील अवैध धंदे आणि या धंद्यांशी संबंधीत राजकीय आणि समाजकारणातील प्रतिष्ठीत लागेबांधे,धनदांडग्यांचा दबाव झुगारून झालेल्या कारवाया पोलीस अधिक्षकांच्या कर्तव्य तत्परतेचा दाखला देत आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिडकोत भरदिवसा कारची काच फोडून साडेपाच लाख रुपये लांबवले

Next Post

येवल्यात Sea fans व Sea Black Corals ची तस्करी; वनविभागाचा छापा, एकाला मुद्देमालासह अटक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

daru 1
संमिश्र वार्ता

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी मोठी कारवाई…१ कोटी ५६ लाखाचा मुद्देमाल जप्त

सप्टेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना वाहन खरेदीचा योग, शनिवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 6, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात एलआयसीच्या या अधिका-याला दिली ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 5, 2025
IMG 20250904 WA0382 1
संमिश्र वार्ता

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव….परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

सप्टेंबर 5, 2025
CM
संमिश्र वार्ता

आता राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ …१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

सप्टेंबर 5, 2025
A90 LE KV e1757035342319
संमिश्र वार्ता

आयफोनसारख्या डिझाईनसह हा फोन लाँच….६,३९९ रुपये आहे किंमत

सप्टेंबर 5, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना आता इतकी मुदत…

सप्टेंबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
Next Post
IMG 20210817 WA0280 e1629215820561

येवल्यात Sea fans व Sea Black Corals ची तस्करी; वनविभागाचा छापा, एकाला मुद्देमालासह अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011