बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्ह्यातील या सरकारी रुग्णालयांमध्ये होणार कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था

by Gautam Sancheti
एप्रिल 25, 2021 | 4:56 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210425 WA0043

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून १० कोटी ८८ लक्षच्या ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टला मंजुरी
नाशिक जिल्हा रुग्णालयासह ९ रुग्णालयात होणार ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट – छगन भुजबळ
नाशिक –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यात ९ रुग्णालयांमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांट ला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लक्ष रुपयांच्या या अत्यावश्यक प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता दिलीआहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयात स्वतःचा ऑक्सिजन प्लांट निर्माण होऊन ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सद्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयासह
जिल्ह्यातील ४ उपजिल्हा रुग्णालय व ४ ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यात यावी असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १० रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यासाठी १० कोटी ८८ लक्ष रुपयांच्या या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा रुग्णालयासोबत मनमाड, येवला, कळवण व चांदवड या उपजिल्हा रुग्णालयात तर सिन्नर,पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात सदर प्लांट कार्यान्वित होणार आहे. या प्लांटच्या माध्यमातून प्रतिदिन नैसर्गिक स्वरूपात ८६० जम्बो सिलेंडरची निर्मिती करण्यात येऊन सदर रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे.
विशेष म्हणजे सदर प्रकल्पामुळे लिक्विड ऑक्सिजनची गरज भासणार नसून नैसर्गिक स्वरूपात हवेतील प्राणवायू यातून मिळणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा येणार खर्च कमी होणार असून कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे. सदर प्लांटसाठी मेंटेनन्सच्या खर्चात देखील मोठी बचत होणार आहे. सदर ऑक्सिजन प्लांट अतिशय उपयुक्त ठरणार असून कोरोनाच्या काळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्या नंतर आता प्रकल्पाची पुढील प्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्तरावर राबवून एक महिन्याच्या आत सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात मोफत लस मिळणार की नाही? नवाब मलिक म्हणाले की,

Next Post

पिंपळगाव बसवंत:  उपजिल्हा रुग्णालयात होणार ऑक्सिजन प्लॅन्ट, आमदार बनकर यांची माहिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

2 1 1 1024x681 1
संमिश्र वार्ता

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मिळणार…

ऑगस्ट 27, 2025
539613361 1218995730272784 914712606899021038 n
स्थानिक बातम्या

मुंबई येथे नाशिकच्या उद्योजकांच्या संघटनेसोबत वीज दराबाबत महत्त्वपूर्ण बैठक….ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 27, 2025
accident 11
क्राईम डायरी

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणा-या महिलेस दुचाकीची धडक…उपचारादरम्यान मृत्यू

ऑगस्ट 27, 2025
facebook insta
क्राईम डायरी

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट स्विकारणे महिलेस पडले महागात…सव्वा सोळा लाखाला गंडा

ऑगस्ट 27, 2025
GzWXER0a4AICfsU scaled e1756290053297
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणेशाचे आगमन…बाप्पाला घातले हे साकडे (बघा, व्हिडिओ)

ऑगस्ट 27, 2025
Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना…ठिकठिकाणी स्वागत,पत्नी व मुलीला अश्रू अनावर

ऑगस्ट 27, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

या महाविद्यालयातील २१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…महाराष्ट्रातील २ शिक्षकांचा समावेश

ऑगस्ट 27, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा

ऑगस्ट 27, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

पिंपळगाव बसवंत:  उपजिल्हा रुग्णालयात होणार ऑक्सिजन प्लॅन्ट, आमदार बनकर यांची माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011