नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोंदे ते पिंपरी सदो यादरम्यान सहापदरी महामार्ग व्हावा यासाठी खा.हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना आता मोठे यश आले आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूकआणि महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण होणेकामी सुमारे सातशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे नाशिक-मुंबई दरम्यानच्या वाहतुकीची कोंडी टाळणार असून धुळे ,नंदुरबार आणि जळगाव या खान्देशातील प्रवाशांना समृद्धी महामार्गाला सहजपणे जॉईन होऊन मुंबईला कमीत कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या सहापदरी महामार्गाचे येत्या 18 डिसेंबर रोजी केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
गोंदे फाटा ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्यावर सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. पिंपरी सदो पासून समृद्धी महामार्ग हा अगदीच हाकेच्या अंतर्गत आहे .त्यामुळे नाशिक – मुंबई दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार हेमंत गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते.या मागणीसाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीत जाऊन रस्ते ,वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची अनेक भेट घेतली होती.
नासिक – मुंबई महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी आणि धुळे ,जळगाव ,नंदुरबार येथील प्रवाशांना पिंपरी सदो शिवारातील समृद्धी महामार्गावर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण होणे किती गरजेचे आहे हे खा. गोडसे यांनी नामदार नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिले होते. खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने आज ना.गडकरी यांनी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी सातशे कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे.येथे अठरा डिसेंबर रोजी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या वीस किलोमीटर रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
Nashik Gonde Pimpri Sado Six Lane Highway
Mumbai Highway Development Road Project