नाशिक – संपूर्णम संकलन सेवा फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण पूरक असा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यातअंतर्गत देवदेवतांच्या भग्न झालेल्या मूर्ती आणि फोटो जमा करण्यात येणार आहेत. नाशिक शहरासह उपनगरात येत्या रविवारी (दि.15 मे) सकाळी १० नंतर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
गंगापूर नाका, रविवार कारंजा, कॉलेज रोड, इंदिरानगर, गोविंद नगर, महात्मा नगर, सिटी सेंटर मॉल, नाशिक रोड, आर.टी.ओ. कॉर्नर आदी ठिकाणी संकलन केंद्र असणार आहे. या उपक्रमास भाविकांनी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन फाऊंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा अॅड. तृप्ती गायकवाड व सहकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. 8850328225 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.