गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरू… मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन (व्हिडिओ)

by India Darpan
जुलै 15, 2023 | 7:58 pm
in संमिश्र वार्ता
0
F1FSHUfagAADv9V

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाने मुलींसाठी सुरू केलेली सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था ही देशासाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी व्यापीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानीटकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले, अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू कविता राऊत, संस्थेच्या संचालिका मेजर (निवृत्त) सईदा फिरासत आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटनचा कार्यक्रम एक आगळावेगळा कार्यक्रम आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे. महाराष्ट्रात मुलींसाठी अशा प्रकारची संस्था सुरू होणे ही गौरवास्पद बाब आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून आज ही सैनिकी प्रशिक्षण संस्था उभी राहीली आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून मुली देशसेवेसाठी सैन्यात दाखल होऊन अधिकारी पदापर्यंत पोहचण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे. या मुलींना दर्जेदार सैनिकी प्रशिक्षण अनुषंगिक सेवासुविधा प्राप्त होण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही. या संस्थेच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहील. असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी योवळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सैनिकी स्कूलच्या मुलींशी मनमोकळा संवाद साधला.

दर्जेदार शिक्षणातून ध्येयपूर्ती साध्य होते : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मनोगतात म्हणाले, दर्जेदार शिक्षणातून आपली ध्येयपूर्ती सिद्ध करण्यासाठी या संस्थेतून नक्कीच वाव मिळेल यात शंका नाही. आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशभक्तीची भावना मनात ठेवून मुलींनी या संस्थेत प्रवेश घेतला आहे ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राला स्त्रीशक्तीचा वारसा लाभला आहे. हाच वारसा या मुली पुढे घेवून जातील यात शंका नाही. कोणत्याही क्षेत्रात शैक्षणिक गुणवत्ता असेल तर यशप्राप्ती नक्कीच होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संस्थेला सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल असे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे आपल्या मनोगतात म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलींना प्रवेश देण्यासाठी नाशिक येथे देशातील पहिली मुलींची सैनिकपूर्व प्रशिक्षण संस्था सुरू झाली आहे, ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेच्या संचालिका मेजर (निवृत्त) सईदा फिरासत कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात म्हणाल्या, मुलींच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी महाराष्ट्रातून 4 हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून लेखी परिक्षेतून 150 मुलींच्या मुलाखतीतून अंतिम 30 मुलींची निवड झाली आहे. त्या मुली आज या संस्थेत प्रशिक्षण घेत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला माजी सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा खरंच फायदा झाला का? उपस्थितांनी दिली ही प्रतिक्रीया

Next Post

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळांची सुटका?

India Darpan

Next Post
chhagan bhujbal e1653742993678

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळांची सुटका?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011