नाशिक – तालुक्याच्या पस्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून एक दोन नव्हे तर तब्बल पाच बिबट्याचा संचार सध्या वाढला आहे. वाडगावजवळ असलेल्या दाबडगावातील शिवारातील दाबडदरा येथे बिबट्याने पाच वर्षीय शिवन्या वाळू निबेकर हिच्यावर गुरुवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
शिवन्या ही नेहमीप्रमाणे घराबाहेर खेळत असताना अंधाराचा फायदा घेत दबा धरून असलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. दरम्यान एक मोटरसायकल रस्त्याने जात असतांना तिचा हेडलाईट बिबट्याच्या डोळ्यावर चमकला आणि त्यामुळे घाबरलेला बिबट्या शिवन्याला सोडून अंधारात पळून गेला. बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.