नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांच्या उदंड प्रतिसादामुळे यंदाही गोदावरी प्रदूषण रोखण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न होते. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. गणेश विसर्जनात सुमारे 143.905 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. 1 लाख 97 हजार 488 गणेश मूर्तींचेही संकलन झाले आहे.
मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या विसर्जन स्थळांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे. मनपाच्या सहा विभागात एकूण ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन ठिकाणांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे. बांधकाम विभागाने कृत्रिम तलाव उभारले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेबाबत नियोजन करून निर्माल्य संकलित केले आहे. ‘मिशन विघ्नहर्ता 2022 फिरता तलाव’ या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
सामजिक संस्थांची मदत
निर्माल्य जमा करण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी मदत केली आहे. के. के. वाघ कॉलेजचे ट्रस्टी अजिंक्य वाघ, प्रा. स्वानंद डोंगरे आणि 300 विद्यार्थी, वृक्षवल्ली फाउंडेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्कार सोनवणे व त्यांचे 20 स्वयंसेवक , बिटको कॉलेजचे विजय सुकटे व त्यांचे 100 स्वयंसेव , दिल्ली पब्लिक स्कूलच्या साक्षी बनसोडे व त्यांचे 16 विद्याथी , पोलिस मित्र आडगाव पोलीस स्टेशन यांचेकडील 50 स्वयंसेवक, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे 50 स्वयंसेवक, नाशिक रोड गुरुद्वारा, रोटरी क्लब ऑफ गोदावरी, रोटरी क्लब ऑफ वेस्ट, रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांच्या प्रत्येकी 25 सदस्य आणि भोसला मिलिटरी स्कुलच्या 100 कॅडेटनी उपस्थित राहून मूर्ती संकलनात सहभाग नोंदवला आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विभागाचे स्वच्छता निरीक्षक आणि विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेउन मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, उपायुक्त करुणा डहाळे, उपायुक्त अर्चना तांबे, उपायुक्त विजयकुमार मुंढे, सहा विभागाचे विभागीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. बांधकाम, विद्युत विभागाचे सहकार्य लाभले.
144 मेट्रिक टन निर्माल्य संकलन
पूर्व विभाग – 21290 किलो ग्रॅम
पश्चिम विभाग – 13940 किलो ग्रॅम
नाशिक रोड – 20545 किलो ग्रॅम
पंचवटी विभाग – 36010 किलो ग्रॅम
सिडको विभाग – 22275 किलो ग्रॅम
सातपूर विभाग – 29845 किलो ग्रॅम
एकूण – 143.905 मेट्रिक टन
1 लाख 97 हजार 488 मूर्ती संकलित
1 पंचवटी – 72866
2 सिडको – 17828
3 नाशिक रोड 50597
4 नाशिक पश्चिम -: 10508
5 नाशिक पूर्व 20478
6 सातपूर -: 25211
एकुण 1,97,488
टॅंक ऑन व्हील (फिरता तलाव)
नाशिक रोड-31
पंचवटी 72
सिडको 146
सातपूर 132
एकूण – 381
Nashik Ganesh Idol and Nirmalya Collection
Godavari Pollution NMC Eco Friendly