नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीने आपले वेगळेपण जपत ढोल-ताशांच्या गजरात आणि संततधार पावसातही भाविकांच्या सहभागातून लाडक्या गणरायाला साश्रुनयनांनी भावपूर्ण निरोप दिला. शनिवार ६ सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अखेर पहाटे ४ वाजल्यानंतर संपन्न झाली. सुमारे १६ तास अखंड चाललेल्या या मिरवणुकीत भक्तांच्या उत्साह ओसंडून वाहत होता.
मिरवणुकीचा शुभारंभ
जुन्या नाशिकमधील वाकडी बारव येथून परंपरेनुसार मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त व प्रशासक मनिषा खत्री आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते मनपाच्या मानाच्या पहिल्या गणपतीची आरती करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीफळ वाढवून, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीचा प्रारंभ झाला.
यावेळी आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्तीचरणदास महाराज,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, रामसिंग बावरी तसेच माजी महापौर विनायक पांडे माजी उपमहापौर प्रथमेश गीते तसेच सुनील बागुल, सुरेश पाटील, गणेश गीते, हेमलता पाटील, सुधाकर बडगुजर, सुनील केदार, चंद्रकांत खोडे आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या वैशिष्ट्य पूर्ण असलेल्या ढोलवादनात सहभाग घेतला, तर आमदार देवयानी फरांदे यांनी टाळ वाजवत साथ दिली.
मनपा अधिकाऱ्यांचा उत्साही सहभाग
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनीही ढोल वाजवत मिरवणुकीत परंपरेचा आनंद घेतला. महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी हेही उत्साहात सहभागी झाले. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर,उपायुक्त अजित निकत
शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, गणेश मैड, प्रशांत पगार, रवींद्र बागुल, रवी पाटील, दीपक मालवाल, समीर रकेट , विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन घुगे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद या सर्वांनी उत्साहाने नृत्याचा ठेका धरत मिरवणुकीत सहभाग घेतला.
मानाचे गणपती क्रमवारीनुसार मार्गस्थ
- महापालिकेचा मानाचा गणपती
- रविवार कारंजा मित्रमंडळाचा चांदीचा गणपती
- गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळ
- साक्षी गणेश मानाचा
- श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ
यानंतर शहराचा महागणपती शिवसेवा मित्रमंडळाचा ‘नाशिकचा राजा’, दंडे हनुमान मित्र मंडळ,युवक मित्रमंडळ, मुंबई नाका, युनायटेड फ्रेंड्स सर्कलसह एकूण २५ मंडळांचे चित्ररथ विसर्जनासाठी मार्गस्थ झाले.
भाविकांची मोठी गर्दी व पारंपरिक उत्सवमय वातावरण
हवामान विभागाने शहरासाठी येलो अलर्ट तर घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीदेखील नाशिककरांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या ठेक्यावर व गुलालाच्या उधळणीत सहभाग घेऊन गणरायाला निरोप दिला.
पोलीस व मनपा प्रशासनाचा चोख बंदोबस्त
मिरवणुकीवर एकूण ८३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.
विविध मार्गावर वाहतूक नियोजनाकरिता बॅरॅकेट्स लावण्यात आले होते.
प्रथमच एआय तंत्रज्ञानयुक्त कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला.
मनपा प्रशासनाने नदी किनार परिसरात जीवरक्षक पथके तैनात होती.
गणेश विसर्जन 2025 विभागनिहाय मूर्ती संकलन
पंचवटी -90269
सातपूर-22792
सिडको -29867
पश्चिम -11328
पूर्व -21045
नाशिक रोड-50876
एकूण -226177
एकूण निर्माल्य संकलन १७६.५७५ मॅट्रिक टन
१७६५७५ किलोग्रॅम
एकूण वाहन संख्या ८३
१) नाशिक पूर्व: १८.४५० मे. टन (वाहन संख्या ११)
२) नाशिक पश्चिम: १९.६५५ मे. टन (वाहन संख्या ११)
३) नाशिक रोड :२२.१४५ मे. टन, (वाहन संख्या १२)
४) पंचवटी: ४५.९४५ मे. टन (वाहन संख्या १५)
५) सिडको :३२.८८० मे. टन (वाहन संख्या १७)
६) सातपूर :३७.५०० मे. टन (वाहन संख्या १७)
एकूण निर्माल्य संकलन :१७६.५७५
अशी माहिती नाशिक महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक तथा कर विभागाचे उपायुक्त अजित निकत आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी निर्माले संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे.