शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकच्या पूरस्थितीचा मंत्री भारती पवार यांनी घेतला दिल्लीतून आढावा; प्रशासनाला दिले हे निर्देश

by Gautam Sancheti
जुलै 16, 2022 | 2:46 pm
in स्थानिक बातम्या
0
1 539 1140x760 1

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): – जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी आपत्ती सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. या आपत्तीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयासोबतच शाश्वत स्वरूपाचे उपाय करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील उपाय योजनांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी घेतला याबैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेजा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एन.एम.खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी (जि. प). डॉ.कपिल आहेर उपस्थित होते.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित होत्या. केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार पुढे म्हणाले की, आपत्ती काळात जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग,गृह विभाग या सर्व विभागांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे या सर्व विभागांनी एकमेकांच्या सतत संपर्कात राहून आपत्ती काळात निरंतर सेवा द्यावी. पावसाळ्यानंतरच्या उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवरही भर देण्यात यावा. वाढणारे पाणी लक्षता घेता धरणे, बंधारे याबाबत दक्षता घेण्यात यावी, असेही डॉ.पवार यांनी यावेळी सांगितले.

वाहतूक नियंत्रण प्रणालीचा करावा अवलंब
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झालेले खड्डे तात्काळ बुजवण्यावर भर देण्यात यावा. ज्या पुलांवरुन पाणी जात असेल अशा ठिकाणी सूचना फलक, डिजिटल फलक लावण्यात यावे. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, काही बंधाऱ्यांचे भराव वाहून गेले असतील त्या ठिकाणी तात्काळ भराव करण्यात यावा. नाशिक-मुंबई रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने त्या ठिकाणी मोठ्या वाहनांना मार्गदर्शन करण्यासाठी पथके तैनात करण्यात यावीत. तसेच वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण प्रणाली राबवावी, अशा सूचना संबधित यंत्रणेला यावेळी डॉ.पवार यांनी दिल्या आहेत.

पावसाळातील साथरोग नियंत्रणासाठी सतर्क रहावे
सततच्या पावसामुळे संपर्क तुटलेला गावांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचा सूचना देण्यात याव्यात. पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे. गावागावात शुद्ध पाणी पिण्याबाबत जनजागृतीसाठी सर्व ग्राम समित्यांना जिल्हा परिषदेने सूचित करावे. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची मदत घेण्यात यावी. ग्रामीण भागातील ज्या गर्भवती महिलांची प्रसूती जवळ आली असेल अशा महिलांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी इमर्जन्सी रोड मॅप तयार करण्याच्या सूचना यावेळी डॉ.पवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे. तसेच अनेक ठिकाणी आपत्तीमुळे घरांचे नुकसान झालेले असून अशा ठिकाणी निवासी गृह तयार करुन नागरिकांची राहण्याची सोय करावी. तसेच कुणी उपाशी राहू नये यासाठी जेवण पोहचविण्याची व्यवस्था करावी. आवश्यक तिथे गावकऱ्यांची व विविध सामाजिक संस्थाची मदत घेण्यात यावी. जिल्हाधिकारी गंगाथरन.डी. यांनी यावेळी जिल्ह्यातील झालेले पर्जन्यमान, धरणसाठा, मनुष्यहानी, जनावरांची हानी, स्थलांतर कुटुंब, कृषी आदी विषयांची माहिती यावेळी दिली.

Nashik Flood Minister Dr Bharti Pawar Review Meet from Delhi

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केळझर धरणाला गोपाळ सागर नाव का पडले? जाणून घ्या या धरणाची अनोखी जन्मकथा

Next Post

येवला तालुक्यातील भारम येथे हॉटेलमालकाने केला मजुराचा खून

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

येवला तालुक्यातील भारम येथे हॉटेलमालकाने केला मजुराचा खून

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011