नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न औषध प्रशासनाचा धडक कारवाई करत परराज्यातून येणारा २२ हजार ३०० रुपये किंमतीचा १३० किलो स्वीट मावा जप्त केला आहे. शहरातील बरेच मिठाई विक्रेते हे परराज्यातून येणाऱ्या स्पेशल बर्फीचा वापर पेढा बर्फी मिठाई व तत्सम पदार्थ बनवण्याकरिता करत असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
या कारवाईत व्दारका येथील वीर ट्रॅव्हल्स आणि पार्सल सर्व्हिसेस येथे अधिका-यांनी पाळत ठेवली. त्यानंतर तेथे आलेल्या एका खासगी प्रवासी बस मधून नाशिक येथील उपनगरमधील मे. यशराज डेरी अँड स्वीट्स सिन्नर तालुक्यातील आडवाडी येथे राहणारे शांताराम बिन्नर यांनी गुजरात मधून डिलिशियस स्वीट्स व हलवा हे अन्नपदार्थ मागविले असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून वरील अन्नपदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित १३० किलो २२ हजार ३०० वजनाचा साठा जप्त करण्यात आला.
या कारवाईबाबत अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या अधिका-यांनी सांगितले की, परिवहन कायद्यानुसार खासगी प्रवासी बसव्दारे व्यावसायिक दृष्टीने सामान किंवा अन्नपदार्थ यांची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे नाशिक विभागातील सर्व खासगी बस वाहतूकदारांनी अन्नपदार्थाची वाहतूक करू नये. त्याचप्रमाणे नाशिक शहरातील मिठाई विक्रेता संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन विक्रेत्यांना गुजरात बर्फीचा वापर करून पेढे, मिठाई बनवून त्यांची विक्री करू नये याबाबत सूचना दिलेल्या आहेत. सदरची कारवाई नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे व मनीष सानप (सहाय्यक आयुक्त) यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती सुवर्णा महाजन व प्रमोद पाटील अन्नसुरक्षा अधिकारी यांनी केली.
मालेगावात मेडिकल दुकानावर कारवाई
येथील मामलेदार लेनमधील मे. सैफी मेडिकल एजन्सी येथे विक्रीसाठी साठवलेल्या Neauracuitical (Nutriown) चा साठा लेबल दोषयुक्त आढळला. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने २४ हजार ९४० रुपये किंमतीच्या १७५ बॅाटल्स जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात दिल्या. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयामार्फत अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी याप्रकरणी उत्पादकांपर्यंत कारवाई केली. प्रशासनामार्फत कोणीही विक्रेत्याने कायद्यांच्या तरतुदीचे पालन करूनच व्यवसाय करावा अन्यथा प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला. ही कारवाई सह आयुक्त नाशिक विभाग संजय नारागुडे व विवेक पाटील सहाय्यक आयुक्त अन्न यांचे मार्गदर्शनाखाली योगेश देशमुख अन्नसुरक्षा अधिकारी यांनी केली.
Nashik FDA Sweet Mawa Seized adulteration
food and drug