नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या नाशिक शहरात बनावट पनीर व भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याच्या चर्चेनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक पथकाने सिडकोत मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी असलेल्या मे. आशीर्वाद डेअरी एन फिफ्टीथ्री, या डेअरीरची तपासणी केली. त्यानंतर या डेअरीत अत्यंत अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा साठवल्याचे निदर्शनास आले. सदर पनीरचा भेसळीच्या संशयावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित ४३७ किलोग्रॅम किंमत १ लाख ८ हजार ४४० चा साठा जप्त केला होता. त्यानंतर हा साठा नाशवंत असल्याने जन आरोग्याच्या दृष्टीने जागेवर नष्ट केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
पंधरा दिवसापूर्वी ही कारवाई केल्यानंतर आज याबाबत प्रशासनाने सविस्तर माहिती दिली. सदर मोहिमेत एकूण एक अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेला असून विश्लेषण अहवाल प्राप्त होतात अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये पुढील कारवाई घेण्यात येईल. सदरची धडक मोहीम ही यापुढेही सुरू राहणार आहे. तरी अन्न व्यवसायिकांनी अन्नपदार्थात भेसळ करू नये, भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल असे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले.
त्याचप्रमाणे प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहनही करण्यात आले, दर्जासंबंधी संशय असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क करावा. त्याचप्रमाणे नागरिकांनी व हॉटेल व्यवसायिकांनी स्वस्त विना बिलाव्दारे विक्री करण्यात येणारे पनीर विकत घेऊ नये. सदरची कारवाई अन्नसुरक्षा पी. एस. पाटील व अविनाश दाभाडे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप व संजय नारागुडे सह आयुक्त नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
nashik fda cidco dairy adulteration paneer seized
food and drug administration food milk