नाशिक जिल्ह्यातील विविध बँकामधील दावा न केलेल्या ठेवींसाठी
3 लाख 69 हजार 998 खातेदारांना विशेष मोहिमेद्वारे आवाहन
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील विविध बँकामध्ये वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 142 कोटी रूपयांच्या दावा न केल्याल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा एकूण 3 लाख 69 हजार 998 खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले असून यात सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटींचे आयोजन करण्यात आले आहे. खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भिवा लवटे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ही मोहिम 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत राबविण्यात येत असून यात जिल्हा अग्रणी बँक- बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्यातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. देशभरात सुमारे रूपये 1 लाख 35 हजार कोटी रूपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात रूपये 5 हजार 866 कोटी ज्यात वैयक्तिक खात्यांच्या रूपये 4 हजार 612 कोटी, संस्थांच्या रूपये 1 हजार 82 कोटी आणि सरकारी योजनांतील रूपये 172 कोटी रूपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, 10 वर्षापासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (Depositor Education and Awarness Fund- DEAF) मध्ये हस्तांतरित केल्या जातात, तथापि खातेदारांना आपले पैसे परत मिळविण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे.
अशा आहेत जिल्ह्यतील बँकामधील दावा न केलेल्या ठेवी
1) स्टेट बँक ऑफ इंडिया- खातेदार संख्या 1,03,495- ठेव रक्कम रूपये 47.34 कोटी
2) बँक ऑफ महाराष्ट्र- खातेदार संख्या 5,575- ठेव रक्कम रूपये 26.60 कोटी
3) बँक ऑफ इंडिया- खातेदार संख्या 56,533- ठेव रक्कम रूपये 13.20 कोटी
4) युनियन बँक ऑफ इंडिया- खातेदार संख्या 32,481- ठेव रक्कम रूपये 11.86 कोटी
5) कॅनरा बँक – खातेदार संख्या 33,535- ठेव रक्कम रूपये 7.80 कोटी
6) बँक ऑफ बरोडा – खातेदार संख्या 25453- ठेव रक्कम रूपये 7.50 कोटी
7) पंजाब नॅशनल बँक- खातेदार संख्या 1,446- ठेव रक्कम रूपये 4.96 कोटी
8) आयसीआयसीआय बँक- खातेदार संख्या 15,889- ठेव रक्कम रूपये 4.51 कोटी
9) सेंट्रल बँक ऑफ इंडिया- खातेदार संख्या 14,276- ठेव रक्कम रूपये 4.17 कोटी
10) आयडीबीआय- खातेदार संख्या 14,219- ठेव रक्कम रूपये 3.87 कोटी
11) एक्सिस बँक (AXIS Bank) – खातेदार संख्या 10,636- ठेव रक्कम रूपये 3.61 कोटी
12) एचडीएफसी – खातेदार संख्या 5,346- ठेव रक्कम रूपये 1.94 कोटी
13) इंडियन ओव्हरसीज बँक – खातेदार संख्या 5898- ठेव रक्कम रूपये 1.39 कोटी
14) यूको बँक – खातेदार संख्या 6,233- ठेव रक्कम रूपये 1.39 कोटी