नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कार्डिअन करेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशन, नाशिक आणि सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथे पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन संधी, शेतकऱ्यांना जोड धंदा, व्यवहार्यता याबाबत कोंकण कृषी विद्यापीठाचे मत्स्य शास्त्रज्ञ एकदिवसीय मत्स्यपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मत्स्य प्रशिक्षण शिबिर सुगी फार्मर प्रोड्युसर कंपनी, ताहराबाद येथे मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ ते सायं. ४:३० या वेळेत होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी नील क्रांती अर्थात ब्लु रिव्हॉल्युएशनचा एक भाग म्हणून पिंजरा मत्स्यपालन उपक्रमा अंतर्गत मोफत मत्स्यपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मत्स्य शेती, मत्स्यपालन व मुल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती, मत्स्य चकली, मत्स्य खिमा, मत्स्य बटाटा, मत्स्य पॅटीस, मत्स्य कटलेट, मत्स्य पापड याबाबत माहिती देण्यात येणार असून यापैकी काही खाद्य पदार्थांची निर्मिती याबाबत मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, खारजमीन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर वैद्य हे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बागलाण चे आमदार दिलीप बोरसे, सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे, नाशिक विभागाचे मत्स्य विभाग उपायुक्त संजय वाटेगावकर, सहाय्यक आयुक्त प्रणिती चांदे, नाबार्डचे डीडीएम अमोल लोहकरे, मत्स्य उद्योग भूषण पुरस्कार विजेते अशोक गायकर, बागलाणचे सामाजिक कार्यकर्ते आबा बच्छाव उपस्थित राहणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मत्स्यपालन करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी, फिश फार्मिंग शेतकरी उत्पादक कंपनी, धरण क्षेत्रात मत्स्यपालन करणाऱ्या मत्स्य संस्था, शेततळे मालक शेतकरी, पेसा तलाव ठेकाधारक, आदिवासी सहकारी संस्था, आत्मा शेतकरी गट यांच्यासाठी हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त असून या सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्डिअन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने अनिकेत सोनवणे, रवींद्र अमृतकर, स्वप्निल चौधरी, नितीन गायकर यांनी केले आहे.
प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी या संपर्क क्रमांकावर 8412995454 तसेच या email: ngocardion.correct@gmail.com संपर्क साधावा.
Nashik Farmers Joint Business Opportunity Free Training