नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रविवार कारंजा येथील प्रसिद्ध चांदीचा गणपती मंदिरात आज पहाटेच्या सुमारास चोरीची थरारक घटना घडली. मंदिराच्या दरवाजाची काच फोडून मंदिरात शिरलेल्या चोरट्याने ३०० ग्रॅम सोन्याची पॉलिश असलेले दागिने घेऊन फरार होण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदीचा गणपती मंदिरात आज पहाटे चोरीचा प्रयत्न झाला. चांदीचा गणपती मंदिरातील सुरक्षारक्षकाला याची चाहूल लागली. त्याने तातडीने चोराला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्याने सुरक्षारक्षकावर रॉडने हल्ला केला. या परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी चोराचा पाठलाग केला.
पोलिसांपासून बचाव करण्यासाठी या चोराने जवळच असलेल्या गोदावरी नदी पात्रात उडी मारली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतले. या घटनेत मंदिराच्या जखमी सुरक्षा रक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा चोरीचा संपूर्ण थरार मंदिराच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस अधिक तपास करत आहे.
? *नाशिकच्या प्रसिद्ध चांदीचा गणपती मंदिरात चोरीचा प्रयत्न*
सुरक्षा रक्षक जखमी, चोरटा ताब्यात
(CCTV व्हिडिओ)?
https://t.co/SR12KYiX1Q#indiadarpanlive #nashik #famous #chandicha #ganpati #temple #theft #cctv #video pic.twitter.com/2N623mgRtP— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 17, 2023
Nashik Famous Chandicha Ganpati Temple Theft CCTV Video