नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ए.बी.बी. या बहुराष्ट्रीय कंपनीच्या द जजेन डॉर्मन फौंडेशन तर्फे इंजिनीरिंग मध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती देण्या मागील मुख्य उद्देश गरीब आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या विध्यार्थाना उच्च दर्जाचे शैक्षणिक यश आणि त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे हा असून त्यासाठी त्यांना अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांपासून तर शेवटच्या वर्षापर्यंत महाविद्यालयाची फी, राहण्याचा खर्च , लॅपटॉप आणि आवश्यक पुस्तके-जर्नल यांसाठी मदत करणे इत्यादींचा अंतर्भाव होतो.
ही शिष्यवृत्ती भारता सह जगातील अनेक देशात दिली जाते. सदर शिष्यवृत्ती साठी महाविद्यालयाची निवड करतांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, महाविद्यालयाचे नामांकन आणि विविध स्पर्धा-परिक्षांन मधील सहभाग इत्यादी घटकांचा विचार केला जातो. या शिष्यवृत्ती साठी या वर्षीपासून प्रथमच नाशिक शहराची निवड करण्यात आली. पहिल्याच वर्षी हि शिष्यवृत्ती शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असणाऱ्या नाशिक येथील के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती के के वाघ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी दिली.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षा साठी या शिष्यवृत्ती साठी एकूण १५० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. ह्या अर्जाची शैक्षणिक गुण, विविध स्पर्धा-परिक्षांन मधील सहभाग आणि कुटुंबाची आर्थिक पार्श्वभूमी ह्या निकषांवर, नियुक्त समितीने छाननी केली आणि मानसी जोशी, आदित्य शेळके आणि ईश्वरी भरोटे हे तीन विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. पी के शहाबादकर यांनी दिली.
“स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या प्रयत्नांमधून के.के. वाघ महाविद्यालयाच्या पात्र विद्यार्थ्यांना हि शष्यवृत्ती देता आल्या बद्दल समाधान असून यापुढे दर वर्षी तीन पात्र विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती देण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थांना एबीबी व्यवस्थापनाकडून स्थानिक ABB मार्गदर्शक दिले जातील जे त्यांना ऍडव्हान्स टेकनॉलॉजि, लीडरशिप एन्हान्समेंट, तसेच इतर कॉर्पोरेट लेवल ट्रैनिंग देण्यात मदत करतील” असे ए बी बी इंडिया लिमिटेड नाशिक चे अध्यक्ष मा.श्री गणेश कोठावदे यांनी सांगितले. ABB द्वारे आयोजित केलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना देखील उपस्थित राहण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळू शकेल. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह नेटवर्किंग करता येईल.अभ्यासाच्या शेवटी ABB मध्ये इंटर्नशिप व नोकरी या मध्ये प्राधान्य दिले जाईल असे देखील श्री कोठावदे यांनी सूचित केले.
नुकत्याच ए बी बी नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ह्या तिन्ही विद्यार्थ्यांना एबीबी जजेन डॉर्मन तर्फे सदर शिष्यवृत्ती ए बी बी इंडिया लिमिटेड नाशिक चे अध्यक्ष मा.श्री गणेश कोठावदे आणि के के वाघ संस्थेचे अध्यक्ष मा. समीर वाघ यांच्या हस्ते देण्यात आली. या प्रसंगी एबीबी नाशिक चे HR हेड मा. दयानंद कुलकर्णी आणि विविध प्रतिनिधी तसेच डॉ. शिरीष साने, डॉ प्रमोद शहाबादकर आणि डॉ. पी जे पवार तसेच के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एबीबी मध्ये नोकरी करणारे साधारण ४० हुन अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. के के वाघ संस्थेचे अध्यक्ष मा. समीर वाघ यांनी विद्यार्थांना दिलेल्या सुवर्ण संधी बद्दल एबीबी चे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्या देऊन मिळालेल्या संधीचे सोन करा असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि ए बी बी च्या सिनिअर इंजिनिअर सौ देवश्री कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि मॅनेजर सौ.मेघा नासिककर यांनी मानले.