नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेट भुजबळ नॉलेज सिटी तील डिप्लोमा थर्ड इयर आयटी मधील विद्यार्थी विशाल सटले याने सोशल माध्यमातील स्नॅपचॅट या प्रसिद्ध आप्लिकेशन मध्ये बग एरर शोधून काढला आहे. या संदर्भातील बग स्वीकृती दर्शक ई-मेल विद्यार्थ्यास प्राप्त झाला आहे. मेट पॉलीटेक्नीक चा हा विद्यार्थी सामंजस्य करारांतर्गत सायबर संस्कार या सायबर सेक्युरिटी देणाऱ्या नामांकित संस्थेत इंटर्नशिप (औद्द्योगिक प्रशिक्षण) घेत असून त्या अंतर्गत या विद्यार्थ्याने हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा बग शोधण्याची कामगिरी करून दाखवली आहे.
साधारणपणे या बग मुळे समोरच्या युजरने पाठवलेला फोटो हा स्क्रीन शॉट द्वारे आपल्याकडे ठेवू शकतो व समोरच्या व्यक्तीला काही कळणार नाही त्यामुळे प्रायव्हसी ब्रेक होते, असे या बग चे स्वरूप आहे सायबर संस्कार चे संचालक डॉ तन्मय दीक्षित यांचे याकामी मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यास लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीसाठी मेट भुजबळ नॉलेज सिटी चे विश्वस्त मा समीर भुजबळ , प्राचार्य डॉ राजेंद्र नारखेडे , विभाग प्रमुख संजीव पाटील टीपीओ प्रा उमेश पाठक व प्रा अनिल गोसावी आदींनी अभिनंदन केले आहे.
Nashik Engineering Student Find Snapchat Bug