नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांसाठी येत्या ४ डिसेंबरला खासदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशभरात बेरोजगारीचे संकट मोठे आहे. दुसरीकडे कंपन्यांनाही योग्य कामगार मिळत नाही, अशी ओरड केली जाते. हीच बाब हेरून कंपन्या आणि बेरोजगारांचा संपर्क करून दिला जाणार आहे. विकासकामे तर होताच राहतात पण कुटुंबाचीही विकास झाला पाहिजे, त्यासाठी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. म्हणूनच खासदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे गोडसे यांनी सांगितले.
एकूण २००० हजार बेरोजगारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तसेच पुण्यातील ६८, नाशिकमधील २८ आणि संभाजी नगरमधील १० कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जवळ Opportunityपास १५०० युवकांना तात्काळ नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. औरंगाबादरोड वरील लक्ष्मी लॉन्स येथे होणाऱ्या मेळाव्याचे उदघाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत.
Nashik Employment Melava 1500 Posts Job Vacancy