नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी खासदार गोडसे यांनी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प नाशिकला आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत . नाशिक येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पाची उभारणी करणे गरजेचे आहे. या विषयी सविस्तर पत्र खा.गोडसे यांनी महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे सीईओ डॉ. पी. अलबलगण यांना दिले आहे. गोडसे यांच्या पत्राची दखल घेत अलबलगण यांनी प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेविषयीच्या उपलब्ध अहवालाची माहिती पाठविण्याचे पत्र जिल्हाधिका-यांना दिले आहे. जागा उपलब्धेचा अहवाल जिल्हाधिका-यांनी पाठविताच प्रकल्पाच्या प्रस्तावाला चालना मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प शहरालगतचा शंभर एकर जागेवर होणार असल्याने हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे .
दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून कोरोनापासून तर बेरोजगारांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे . अनेक उद्योग , व्यवसायांचीही परिस्थीती ढासळत चालली आहे . यावर उपाय म्हणून मोठे व सक्षम प्रकल्प उभारणे गरजेचे आहे . यातून नाशिक शहरालगतील ग्रामिण भागात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प उभारण्याचा खा. हेमंत गोडसे यांचा मानस आहे.सदर कल्प आता प्रस्तावित स्वरूपाचा असून याविषयी खा.गोडसे यांनी महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे सीईओ डॉ.पी. अलबलगण यांची भेट घेतली.इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पाचे महत्व,गरज आणि खासदार हेमंत गोडसे यांची बेरोजगारी हटविण्याविषयीची तळमळ भावल्याने डॉ.पी.अलबलगण यांनी लगेच जिल्हाधिकारी डी.गंगाधरन यांना पत्र पाठविले आहे. शहरालगतच्या ग्रामिण भागात शंभर एकरहून अधिक शासकिय जागा कोण- कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत. याविषयीचा सविस्तर अहवाल पाठविण्याच्या सुचना डॉ.पी. अलबलगण यांनी जिल्हाधिका – यांना केल्या आहेत.