नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात पुन्हा फेरमतमोजणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणीची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.
बडगुजर यांनी आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकुण मतदान केंद्राच्या ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटी भरुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सूचना पत्र दिले आहे.
नाशिक पश्चिम मतदार संघातून भाजपच्या सीमा हिरे या विजयी झाल्या आहेत. हिरे यांना १ लाख ४१ हजार ७२५ मते पडली तर सुधाकर बडगुजर यांना ७३ हजार ६५१ मते मिळाली असून ते दुस-या क्रमांकावर आहे. तर मनसेचे दिनकर पाटील यांना ४६ हजार ८४९ मते मिळाली आहे.