गौतम संचेती, नाशिक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी मुख्य लढत बहुतांश मतदार संघात आहे. सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहे. पण, या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. त्या खालोखाल भाजपला जागा मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एक ते दोन मतदार संघात अपक्ष उमेदवार जोरात आहे. माकप व एमआयएम सुध्दा इंन्ट्रीची अपेक्षा असल्याचा अंदाज इंडिया दर्पणचा आहे.
पण, सोशल मीडियावर मात्र वाचकांनी व्यक्त केलेला एक अंदाज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अंदाजात काही जागा जवळपास निश्चित असल्या तरी काही जागेवर मात्र चुरशीची लढत झालेली आहे. त्यामुळे यात बदल होऊ शकतो. तर बघू या वाचकांचा अंदाज
नाशिक जिल्ह्यातील १५ जागेवर या पक्षांना संधी
- राष्ट्रवादी अजित पवार गट – ६
- भाजप – ३
- शिवेसना शिंदे, ठाकरे गट प्रत्येकी एक -२
- शरद पवार गट, काँग्रेस प्रत्येकी एक -२
- माकप, अपक्ष प्रत्येकी एक – २
एकुण – १५
नाशिकमध्ये व्हॅाटसअॅपवर व्हायरल
होत असलेला मतदारसंघ निहाय वाचकांचा अंदाज
नाशिक पूर्व : राहुल ढिकले (भाजप)
नाशिक पश्चिम : सीमाताई हिरे (भाजप)
नाशिक मध्य : वसंत गिते (शिवसेना ठाकरे गट)
देवळाली : सरोजताई अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
इगतपुरी : हिरामण खोसकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)
सिन्नर : माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
दिंडोरी : नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
कळवण : जिवा पांडू गावित (माकप)
मालेगाव बाह्य :दादा भुसे (शिवसेना शिंदे गट)
मालेगाव : एजाज बेग (काँग्रेस)
सटाणा : दिपिका चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट)
देवळा : राहुल आहेर (भाजप)
*नांदगाव : डॉ. रोहण बोरसे (अपक्ष)
येवला : छगन भुजबळ- (राष्ट्रवादी अजित पवार गट)
निफाड : दिलीप बनकर- (राष्ट्रवादी अजित पवार गट)
दुसरा वाचकांचा अंदाज
नाशिक पूर्व : गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार गट)
नाशिक पश्चिम : सुधाकर बडगुजर (शिवसेना ठाकरे गट) किंवा दिनकर पाटील
नाशिक मध्य : देवयानी फरांदे (भाजप)
देवळाली : सरोजताई अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
इगतपुरी : हिरामण खोसकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)
सिन्नर : माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
दिंडोरी : नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
कळवण : जिवा पांडू गावित (माकप)
मालेगाव बाह्य : अव्दैय हिरे (शिवसेना ठाकरे गट) किंवा बंडू बच्छाव
मालेगाव : मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल (एमआयएम)
सटाणा : दिलीप बोरसे (भाजप)
देवळा : केदा नाना आहेर (अपक्ष)
नांदगाव : सुहास कांदे किवा समीर भुजबळ
येवला : छगन भुजबळ- (राष्ट्रवादी अजित पवार गट)
निफाड : अनिल कदम – (शिवसेना ठाकरे गट)
गेलया पंचवार्षिक मध्ये होते असे बलाबल
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले. तर भाजपने पाच जागा जिंकल्या. तर शिवसेनाला २ व काँग्रेस व एमएमआयला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही आमदार शिंदे गटात तर राष्ट्रवादीचे ६ आमदार हे अजित पवार गटात गेले. तर काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले हिरामण खोसकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले आहे.
महायुतीत असे झाले होते जागापाटप
या निवडणुकीत महायुतीने विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षाला देण्याचे निश्चित केल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५ जागांपैकी सर्वाधिक ७ जागा अजित पवार गटाला मिळाल्या आहे. तर त्या खालोखाल भाजपला ५ जागा मिळाल्या आहे. शिंदे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या. मालेगावच्या जागेवर महायुतीने उमेदवार दिलेला नाही.
महाविकास आघाडीत असे झाले जागावाटप
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच व शिवसेना ठाकरे गटाला सहा, काँग्रेसला तीन व एक जागा माकपला गेली. शरद पवार गटाला येवला, दिंडोरी, सिन्नर, नाशिक पूर्व, सटाणा, शिवसेना ठाकरे गटाला नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, नांदगाव, निफाड, मालेगाव या जागा मिळाल्या. तर काँग्रेसला चांदवड, मालेगाव व इगतपुरी हे मतदार संघ सोडण्यात आले. कळवण येथे माकपचा उमेदवार होता.
अशी झाली १५ विधानसभेत लढत
येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी पवार गट)
निफाड – दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) – अनिल कदम ( शिवसेना ठाकरे गट), गुरुनाथ कांदे (प्रहार)
कळवण – नीतीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) – जे. पी. गावित (माकप)
सिन्नर – माणिकराव कोकाटे ( राष्ट्रवादी अजित पवार गट )- उदय सांगळे (महाविकास आघाडी)
दिंडोरी – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – सुनीता चारोस्कर (शरद पवार गट)
देवळाली – सरोज आहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) , डॅा. राजश्री अहिरराव (शिवसेना शिंदे गट), योगेश घोलप (ठाकरे गट), अविनाश शिंदे (वंचित)
इगतपुरी – हिरामण खोसकर (अजित पवार गट) – लकी जाधव (काँग्रेस) निर्मला गावित (अपक्ष)
मालेगाव – दादा भुसे (शिवसेना शिंदे गट) – अव्दैय हिरे ( शिवसेना ठाकरे गट), बंडुकाका बच्छाव (अपक्ष)
नांदगाव – सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट) – गणेश धात्रक (शिवसेना ठाकरे गट), समीर भुजबळ, डॅा. रोहन बोरसे (अपक्ष)
नाशिक पूर्व – अॅड राहुल ढिकले ( भाजप) – गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार गट), प्रसाद सानप (मनसे), जितेंद्र भावे (निर्भय)
नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप) – वसंत गिते (शिवसेना ठाकरे गट), मुशीर सैय्यद (वंचित)
नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप) – सुधाकर बडगुजर (शिवसेना ठाकरे गट) – दिनकर पाटील (मनसे), दशरथ पाटील (स्वराज)
सटाणा – दिलीप बोरसे (भाजप) – दीपीका चव्हाण (शरद पवार गट)
चांदवड – डॅा. राहुल आहेर (भाजप) – शिरीष कोतवाल (काँग्रेस), केदा नाना आहेर (अपक्ष)
मालेगाव – मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल (एमआयएम) – एजाज बेग (काँग्रेस), शान ए हिंद (समाजवादी), आसिफ शेख (अपक्ष)